सलमान, रोहितनंतर आता टायगर श्रॉफ लॉरेन्स बिष्णोईच्या टार्गेटवर
गोळीबाराच्या घटनेची पोलीस आयुक्क्तांनी गंभीर दखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – सिनेअभिनेता सलमान खान, सिनेदिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराजवळ झालेला गोळीबार तसेच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची झालेल्या हत्येनंतर आता लॉरेन्स बिष्णेाईने आपला मोर्चा सिनेअभिनेता टायगर श्रॉफकडे वळविला आहे. जुहू येथे आलेल्या टायगर श्रॉफवर तीन अज्ञात व्यक्तीने अंधाधुुंद गोळीबार करुन बाईकवरुन पलायन केले आहे. या गोळीबारात टायगर श्रॉफला कुठलीही दुखापत झाली नाही, मात्र त्याच्या चालकासह अन्य एक व्यक्ती जखमी झाले. या दोघांवर नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान रविवारी सायंकाळी झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने बॉलीवूडमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था पूर्ण ढासळल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान या गोळीबाराची पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी गंभीर दखल घेत शूटरसह या कटातील सर्व आरोपींच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पंधरा टिमची नियुक्ती केली आहे. या टिमने आरोपींचा शोध सुरु केला असून रात्री उशिरापर्यंत काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे बोलले जाते.
टायगर श्रॉफ हा रविवारी सायंकाळी जुहू येथे त्याच्या वैयक्तिक कामाासाठी आला होता. काम संपल्यानंतर तो त्याच्या चालकासोबत जात होता. त्याची कार सायंकाळी सात वाजता जुहू येथील पुष्पा नरसी पार्कजवळून जात होती. यावेळी बाईकवरुन आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्याच्या कारच्या दिशेने गोळीबार केला होता. जवळपास पाच ते सहा राऊंड फायर केल्यानंतर ते तिघेही बाईकवरुन पळून गेले होते. जुहू पोलीस ठाण्याच्या शंभर मिटरच्या अंतरावर हा गोळीबार झाला होता. या गोळीबाराची माहिती प्राप्त होताचजुहू पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. गोळीबारात टायगर श्रॉफसह एक व्यक्ती जखमी झाला, त्यामुळे या दोघांनाही तातडीने जवळच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यासोबत टायगर श्रॉफ हादेखील होता. या दोघांची प्रकृती प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या जिवावर धोका टळल्याचे सांगण्यात आले.
पोलीस उपायुक्त मोहीत गर्ग यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. गोळीबारानंतर हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला होता. अज्ञात व्यक्तींनी किती गोळ्या फायर केल्या याचा तपास सुरु आहे. दरम्यान या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून घेण्यात आली आहे. हा गोळीबार अनिल पंडित आणि हरमन संधू यांच्याकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आम्ही कॉलद्वारे टायरची समजूत काढली होती. मात्र त्याला आमची भाषा समजली नाही. त्यामुळे हा गोळीबार घडविण्यात आला. मुंबई फिल्म इंडस्ट्रिज आमचं ऐकणार नाही, सलमान खानसोबत काम करणार, अशा व्यक्तींचा पुढचा नंबर असेल असे सोशल मिडीयावर मॅसेजद्वारे ही कबुली देण्यात आली आहे. काही ग्रुपचे लोक आमच्या कामाचा फेम घेत आहेत, त्यांना लवकरच संपवून फेमस करु अशीही धमकी देण्यात आली आहे. त्याखाली लॉरेन्स बिष्णोई, जितेंदर गोगी, हरी बॉक्सर, आरजू बिष्णोई, शुभम लोणकर, पियुष पिपलानी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.
गोळीबारानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याशी फोनवरुन सविस्तर माहिती घेऊन दोषीवर सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पंधराहून अधिक टिम नियुक्त करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत काही संशयितानंा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. यापूर्वी बिष्णोई टोळीने सिनेअभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट, सिनेदिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घराजवळ अशाच प्रकारे गोळीबार केला होता. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.
या तिन्ही गुन्ह्यांत बिष्णेाई टोळीच्या मुख्य शूटरसह इतर सर्व आरोपींना पोलिसांनी अटक झाली असून त्यांचविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ते सर्वजण सध्या कारागृहात आहे. याच गुन्ह्यांत शुभम लोणकरसह इतर काही आरोपी वॉण्टेड असून त्यांच्या आदेशावरुन टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाला होता. या गोळीबाराने बॉलीवूडमध्ये बिष्णेाई टोळीची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. विशेषता सलमान खानच्या संपर्कात असलेल्या या टोळीने टार्गेट केल्याने त्याच्या संपर्कातील लोकांना धम्की जात आहे.