मोबाईल हॅक करुन महिला पोलीस कर्मचार्याच्या नावाने काढले पर्सनल लोन
साडेबारा लाखांच्या फसवणुकीप्रकरणी अज्ञात ठगाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 एप्रिल 2026
मुंबई, – एपीके फाईल पाठवून मोबाईल हॅक करुन अज्ञात सायबर ठगाने चक्क एका महिला पोलीस हवालदाराच्या नावाने सुमारे साडेबारा लाखांचे पर्सनल काढल्याचा धक्कादायक प्रकार विक्रोळी परिसरात उघडकीस आले आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध विक्रोळी पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सायबर ठगाने एका महिला पोलीस कर्मचार्याला फसवणुकीसाठी टार्गेट केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह सायबर ठगांना संमातर तपासाचे आदेश जारी केले आहे.
वैशाली राजेंद्र सावंत या विक्रोळीतील कन्नमवार नगर क्रमांक एकमध्ये राहत असून सध्या मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे. त्यांची नेमणूक विक्रोळी पोलीस ठाण्यात आहे. 9 एप्रिलला तिच्या सॅलेरी बँक खात्यातून 27 हजार 832 रुपये डेबीट झाले होते. अॅपवरुन ही रक्कम डेबीट झाल्याचे दिसून येताच वैशांली सावंतने बॅकेत चौकशीसाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांना त्यांच्या नावावर एक पर्सनल लोन सुरु असून त्याचा हप्ता डेबीट झाल्याचे समजले. यावेळी तिने कुठलेही पर्सनल लोन घेतले नाही असे बँक अधिकार्यांना सांगितले. चौकशीनंतर हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला होता.
18 जानेवारीला तिच्या मोबाईलवर एक एपीके ट्राफिक ई-चलनची एक लिंक सेंट जोसेफ हायस्कूल 8 क्लासच्या ग्रुपवर आला होता. ही लिंक तिच्याकडून चुकून ओपन झाली होती. त्यानंतर तिचा मोबाईल अज्ञात सायबर ठगाने हॅक करुन मोबाईलचा ताबा घेतला होता. या दरम्यान तिला कुठलेही कॉल किंवा मॅसेज आले नाही. नवीन डेबीट कार्डही चालत नव्हते. त्याचाच फायदा घेऊन अज्ञात ठगाने तिच्या नावाने 12 लाख 46 हजार 781 रुपयांचे पर्सनल लोन घेतले होते. ही रक्कम त्याच दिवशी वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. याच पर्सलन लोनचा फेब्रुवारी ते एप्रिल 2026 या तीन महिन्यांत 78 हजार 590 रुपयांचे तीन हप्ते डेबीट झाले होते.
हा प्रकार उघडकीस येताच वैशाली सावंत हिने विक्रोळी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन या ठगाचा शोध सुरु केला आहे. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. त्यामुळे या गुन्ह्यांचा विक्रोळी पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहे.
ज्या बँक खात्यात पर्सनल लोनची रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बॅक खात्यासह खातेदारांची माहिती काढली जात आहे. एपीके फाईल पाठवून एका महिला पोलीस हवालदाराचा मोबाईल हॅक करुन या ठगाने तिच्या नावाने पर्सनल लोन काढून ही फसवणुक केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.