के/पश्‍चिमच्या दोन पालिका अधिकार्‍यांना लाच घेताना अटक

लाचेचा चाळीस हजााराचा पहिला हप्ता घेताना दोघांवर कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ जुलै २०२६
मुंबई, – पाण्याचे मीटर आणि नळ जोडण्यासाठी एक लाख वीस हजार रुपयांची लाचेची मागणी करुन कामापूर्वी लाचेचा चाळीस हजार रुपयांचा हप्ता घेताना के/पश्‍चिम महानगरपालिकेच्या दोन पालिका अधिकार्‍यांना मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अटक अधिकार्‍यांमध्ये जलमापक पर्यवेक्षक विनोद भगवान राठोड आणि जलमापक निरीक्षक नंदन बाळकृष्ण मोरे यांचा समावेश आहे. या दोघांच्या अटकेचे वृत्त समजताच त्यांच्या सहकारी अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.

यातील ५० वर्षांचे तक्रारदार पश्‍चिम उपनगरात राहत असून त्यांच्या मालकीचे दुकान गाळा आहे. २० जुलेला या दुकानासाठी त्यांनी पाण्याचे मीटर आणि पुर्ननळ जोडणीसाठी के/पश्‍चिमच्या संबंधित विभागात अर्ज केला होता. या अर्जानंतर त्यांनी पर्यवेक्षक विनोद राठोड आणि निरीक्षक नंदन मोरे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मीटर जोडणी आणि नळ जोडणीसाठी त्यांच्याकडे एक लाख वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी ती रक्कम कमी करण्याची विनंती केली होती. चर्चेअंती त्यांच्यात ऐंशी हजार रुपये घेण्याचे ठरले होते. यावेळी त्यांनी तक्रारदारांना कामापूर्वी चाळीस हजार आणि कामानंतर चाळीस हजार रुपये देण्यास सांगितले होते.

ही लाच देण्याची तयारी दर्शवून त्यांनी दोन्ही अधिकार्‍याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केलीी होती. या तक्रारीनंतर त्याची संबंधित अधिकार्‍यांकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात त्यांनी पाणयचे मीटर आणि नळ जोडण्यासाठी तक्रारदाराकडे ऐंशी हजाराच्या लाचेची मागणी करुन कामापूर्वी चाळीस हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यानंतर या अधिकार्‍यांनी तिथे सापळा लावला होता. ठरल्याप्रमाणे बुधवारी सायंकाळी सव्वासहा वाजता तक्रारदार लाचेची रक्कम घेऊन अंधेरीतील एस. व्ही रोड, कासमअली शकूर जगमगिया चौकाजवळील टॉप टेन मोबाईल शॉपसमोर गेले होते.

यावेळी नंदन मोरे यांच्या सांगण्यावरुन त्यांनी ती रक्कम विनोद राठोड यांना दिली. यावेळी सापळा लावलेल्या अधिकार्‍यांनी ही रक्कम घेताना विनोद राठोड यांना रंगेहाथ अटक केली. या गुन्ह्यांत विनोद राठोड यांचा सहभाग उघडकीस आल्याने त्यांच्यावर नंतर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर या दोघांनाही गुरुवारी विशेष सेशन कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यांच्या राहत्या घरी या पथकाने कारवाई केली असून त्याचा तपशील समजू शकला नाही. एकाच वेळेस दोन पालिका अधिकार्‍यांना लाचेच्या गुन्ह्यांत अटक झाल्याचे वृत्त समजताच के/पश्‍चिम कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, सहाय्यक फौजदार किसन फटांगरे, पोलीस हवालदार गणेश साटम, जितेंद्र गायकवाड, महिला पोलीस हवालदार उर्मिला मांजरेकर, पोलीस शिपाई देवीदास दारणे, प्रकाश गारळे, महेश वाईंगडे आणि अमीत राणे यांनी केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजीत सुळे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page