मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 एप्रिल 2026
मुंबई, – मालाडच्या एका डेअरी मालकाच्या श्वानसोबत 45 वर्षांच्या व्यक्तीने विकृत अश्लील चाळे केल्याची घटना उघडकीस आली आहे. श्वानासोबत अनैसगिक अत्याचार केल्याप्रकरणी या आरोपीविरुद्ध मालाड पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याच्यावर अटकेची कारवाई केली. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेने प्राणीपे्रमींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
महेश रामसुंदर यादव हा मूळचा बिहारच्या चंपारणचा रहिवाशी असून गेल्या एक वर्षांपासून त्याच्या कुटुंबियांसोबत वसई परिसरात राहतो. मालाड परिसरात एक प्राण्यांचे खाजगी क्लिनिक आहे. याच क्लिनिकमध्ये महेश हा सध्या काम करतो. रविवारी 26 एप्रिलला क्लिनिकमध्ये प्रचंड गर्दी होती, त्यामुळे सर्व स्टाफ रात्री उशिरापर्यंत तिथे काम करत होते. याच दरम्यान तिथे एक महिला आली होती. ही महिला मालाडच्या मालवणी, गेट क्रमांक आठमध्ये राहत असून तिच्या मांजरीची प्रकृती ठिक नव्हती. तिच्याच उपचारासाठी ती क्लिनिकमध्ये आली होती. मांजरीवर उपचार केल्यानंतर ती घरी जाण्यासाठी निघाली.
यावेळी तिला क्लिनिकजवळील फुटपाथवर एक व्यक्ती श्वानासोबत अनैसगिक अत्याचार करत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. श्वान हा जोरजोरात विव्हळत होता. हा प्रकार तिने महेश यादवला सांगितला. त्यानंतर त्याने तिथे जाऊन या व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तो श्वान त्याच परिसरातील एका डेअरी मालकाचा असल्याचे दिसून आले. अचानक झालेल्या आरडाओरडानंतर क्लिनिकमधील इतर कर्मचारी बाहेर आले. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती दिली होती. काही वेळात मालाड पोलिसांची एक टिम तिथे आली होती. या व्यक्तीला पोलिसांच्या स्वाीन करण्यात आले.
चौकशीत त्याचे नाव नरेश असून तो मालाडच्या हनुमान टेकडी परिसरात असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी महेश यादवच्या तक्रारीवरुन मालाड पोलिसांनी नरेशविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि प्राण्याचा छळ प्रतिबधक अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.