सहा वर्षांच्या मुलीचा चौदा वर्षांच्या मुलाकडून विनयभंग
घाटकोपर येथील घटना; आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 एप्रिल 2026
मुंबई, – घरात कोणीही नसल्याची संधी साधून एका सहा वर्षांच्या अल्वयीन मुलीचा तिच्याच शेजारीच राहणार्या चौदा वर्षांच्या मुलाने विनयभंग केल्याची घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी मुलाविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. मंगळवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
36 वर्षांची तक्रारदार महिला घाटकोपर येथे राहते. बळीत तिची सहा वर्षांची मुलगी आहे. तिच्याच शेजारी चौदा वर्षांचा आरोपी मुलगा राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. 25 एप्रिलला तिच्या घरी कोणीही नव्हते. याच संधीचा फायदा घेऊन आरोपी मुलगा तिच्या घरी आला होता. तिची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना त्याने तिच्याशी जवळीक साधून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. तिला बाथरुममध्ये नेऊन तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. त्यानंतर तो घरातून पळून गेला होता.
हा प्रकार अलीकडेच बळीत मुलीकडून तिच्या तक्रारदार आईला समजला होता. ही माहिती ऐकल्यानंतर तिला धक्काच बसला होता. मंगळवारी 5 मेला तिने घडलेला प्रकार घाटकोपर पोलिसांना सांगून आरोपी मुलाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.