गोरेगाव ड्रग्जप्रकरणी महेश खेमलानीला न्यायालयीन कोठडी

दहा दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर कारागृहात रवानगी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 मे 2026
मुंबई, – गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रातील ड्रग्जप्रकरणातील मुख्य आरोपी महेश हिरो खेमलानी ऊर्फ मार्क याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला रविवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दहा दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याला पोलीस बंदोबस्तात कारागृहात पाठविण्यात आले आहे. त्याच्या अटकेने या गुन्ह्यांत अनेक धक्कादायक खुलासे करण्यात वनराई पोलिसांना यश आले आहेत. महेशला विदेशातून ड्रग्ज पुरविणारा त्याचा मित्र पोलिसांच्या रडारवर असून त्याच्याविरुद्ध लवकरच पोलिसांकडून रेड कॉर्नर नोटीस बजाविण्यात येणार आहे.

11 एप्रिलला गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात एका म्युझिक कॉर्न्स्टमध्ये ड्रग्जचा अतिसेवन केल्यामुळे दोन एमबीए विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी भारतीय न्याय सहिता, दारुबंदी अधिनियम आणि एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आतापर्यंत पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून बारा आरोपींना अटक केली होती. त्यात महेश खेमलानी या मुख्य आरोपीचा समावेश आहे. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. 1 मेला तो थायलंड येथून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजाविण्यात आली होती, त्यामुळे त्याला इमिग्रेशन अधिकार्‍यांनी ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी वनराई पोलिसांकडे सोपविले होते.

याच गुन्ह्यांत त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. गेल्या दहा दिवसांपासून त्याची पोलिसाकडून चौकशी सुरु केली होती. या चौकशीतून अनेक गोष्टींचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले होते. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला रविवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्याला पोलीस बंदोबस्तात कारागृहात पाठविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page