सोसायटीच्या मुख्य प्रवर्तकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

म्हाडाचा प्लॉट पुर्नविकासासाठी देतो असे सांगून गंडा घातला

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 मे 2026
मुंबई, – फसवणुकीच्या गुन्ह्यांत एका सोसायटीच्या मुख्य प्रवर्तकासह इस्टेट एजंट अशा दोघांविरुद्ध चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनोदचंद्र हरखलाल गांधी आणि मनुभाई पटेल ऊर्फ सोडी अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांवर म्हाडाचा प्लॉट पुर्नविकासासाठी देतो असे सांगून एका बांधकाम क्षेत्राशी संबंधित कंपनीला सुमारे 67 लाखांना गंडा घातल्याचा आरोप आहे.

लालजीभाई कल्याणजी सोलंकी हे 64 वर्षांचे वयोवृद्ध बोरिवलीतील चिकूवाडी परिसरात राहतात. त्यांची निकुंज निकुंज इन्फ्रास्ट्रक्चर फर्म नावाची एक खाजगी कंपनी असून त्यात त्यांच्यासह त्यांचे दोन्ही मुले गौरव आणि निकुंज सोलंकी हे संचालक म्हणून काम पाहतात. मनुभाई पटेल हा त्यांच्या परिचित इस्टेट एजंट असून ते दोघेही एकमेकांना गेल्या 25 वर्षांपासून ओळखतात. जानेवारी 2018 रोजी तो विनोदचंद्रसोबत त्यांच्या कार्यालयात आला होता. विनोंदचंद्र हा कांदिवलीतील चारकोप, वुडकोर्ट सहकारी सोसायटीचा मुख्य प्रवर्तक आहे. त्याने त्यांच्याकडे एका मोकळ्या प्लॉटची माहितीदिली होती.

हा प्लॉट म्हाडाच्या मालकीचा असून तो त्यांच्या सोसायटीला अलोट झाला आहे. हा प्लॉट डेव्हल्प करायचाअसे सांगून तिथे तुम्ही इमारतीचे बांधकाम सुरु करा. त्यात त्यांना 80 तर सोसायटीला 20 टक्के हिस्सा द्या असे सांगितले. त्यांचा प्रपोजल चांगला होता. त्यामुळे त्यांनी त्याच्याशी प्लॉटबाबत सविस्तर चर्चा सुरु केली होती. यावेळी त्याने त्यांच्याकडे तीन कोटीची मागणी करुन त्यांना संबंधित काम देण्याचे आश्वासन दिले होते. विनोदचंद्र आणि मनुभाईवर विश्वास ठेवून त्यांनी त्यांना ऑक्टोंबर 2018 ते जानेवारी 2019 या कालावधीत 89 लाखांचे पेमेंट केले होते. या पेमेंटनंतर त्यांच्यात एक करार झाला होता.

हा प्लॉट त्यांना देण्यापूर्वी त्यांचा व्यवहार गुरदिपसिंह बिरदी आणि मधुसुदन बिलोसे यांच्यासोबत झाला होता. त्यांच्याकडून त्याने दोन कोटी रुपये घेतले होते. त्यामुळे त्यांनी व्यवहाराचे 50 लाख रुपये गुरदिपसिंग यांना दिले होते. त्याच्याकडून पेमेंट झाल्याचे रिसीट घेण्यात आले होते. याच दरम्यान लालजीभाई सोलंकी यांनी विनोदचंद्रकडून रजिस्टर पॉवर ऑफ अ‍ॅटनी घेतली होती. त्यानंतर कोरोनासुरु झाला, त्यामुळे त्यांचे पुढील व्यवहार थांबले होते. याच दरम्यान 2021 साली या जागेवर सीआरझेड क्लिअरन्ससाठी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

फेब्रुवारी 2025 रोजी न्यायालयाने त्यांना अशा प्रकारचे काही प्लॉट रिकामे असतील तर त्यांना विकासकाम करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर त्यांची कंपनी म्हाडा कार्यालयात पुढील प्रोसेस करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना विनोदचंद्रसोबत केलेला करार रद्द झालेला आहे. त्यांच्या कंपनीकडून त्यांच्याशी कुठलाही आर्थिक व्यवहार झाला नाही असे नमूद करुन त्यांनी हा करार रद्द केला होता. याच दरम्यान विनोदचंद्रने त्यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांना नोटीस बजाविली होती. याबाबत त्यांनी विनोदचंद्र आणि मनुभाई पटेल यांच्याकडे विचारणा केली, मात्र त्यांच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

या दोघांनी म्हाडाचा प्लॉट पुर्नविकास करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 22 लाख चेकद्वारे तर 67 लाख कॅश स्वरुपात घेतले होते. या पैशांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी चारकोप पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर विनोदचंद्र गांधी आणि मनुभाई पटेल यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांची लवकरच पोलिसाकडून चौकशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page