एकतर्फी प्रेमातून तरुणीचा मानसिक शोषण करुन विनयभंग

पाठलाग करुन शारीरिक संबंधाची मागणी केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ जुलै २०२६
मुंबई, – एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या घरी लग्नाचा प्रस्ताव आणून तिच्या वडिलांनी नकार देऊनही तिचा पाठलाग करुन शारीरिक संबंधाची मागणी केल्याप्रकरणी शिवप्रकाश हरिकेश प्रजापती या तरुणाविरुद्ध मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही वर्षांपासून शिवप्रकाश तक्रारदार महिलेचा पाठलाग करुन तिच्याशी जवळीक साधून जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

२४ वर्षांची तक्रारदार तरुणी ही मानखुर्दच्या मंडाळा परिसरात राहत असून तिच्या वडिलांचा दूध डेअरीचा व्यवसाय आहे. याच परिसरात शिवप्रकाश हा राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. गेल्या पाच वर्षांपासून तो तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तिने त्याच्याशी मैत्री करण्यास नकार दिला होता. त्यामुळे तो तिचा सतत पाठलाग करत होता. तिच्याशी जवळीक साधून शारीरिक संंबंधाची मागणी करत होता. मात्र ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. १ एप्रिल २०२६ ती नवी मुंबईतील नेरुळ येथील तेरणा डेंटल कॉलेजमध्ये जाताना त्याने तिचा पाठलाग केला होता.

हा प्रकार तिने तिच्या पालकांना सांगितला होता, त्यानंतर त्यांनी शिवप्रकाशची समजूत काढून तिचा पाठलाग न करण्याचा सल्ला दिला होता. तरीही तो तिचा सतत पाठलाग करुन तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकारानंतर तिने त्याला ब्लॉक केले होते. ती त्याला प्रतिसाद देत नाही म्हणून त्याने तिच्या वडिलांना मेल पाठवून शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली होती.

४ जूनला तो त्याच्या आई, भाऊ आणि इतर नातेवाईकांसोबत तिच्या घरी आला होता. यावेळी त्यांनी शिवप्रकाशसाठी तिच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र तिच्या वडिलांनी हा प्रस्ताव फेटाळून त्यांना घरातून निघून जाण्यास सांगितले होते. यावेळी त्यांनी त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला होता. सतत नकार देऊनही तो तिचा पाठलाग करुन तिच्याशी शारीरिक संबंधाची मागणी करुन तिचा विनयभंग करत होता.

त्याला कंटाळून तिने मानखुर्द पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची मानखुर्द पोलिसांनी गंभीर दखल घेत शिवप्रकाशविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. त्याला पोलिसांकडून योग्य ती समज देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page