वांद्रे येथील पुरुषोत्तम शाळेत ड्रग्जविरोधी जनजागृती मोहीम संपन्न
ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या मोहीमेला विद्यार्थ्यांकडून भरघोस प्रतिसाद
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ जुलै २०२६
मुंबई, – वांद्रे येथील खेरवाडी परिसरात असलेल्या पुरुषोत्तम हायस्कूल शाळेत वांद्रे युनिटच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलकडून ड्रग्जविरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहीमेला शाळेतील शिक्षकासह पालक आणि विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. ही मोहीम यशस्वी राबविणार्या वांद्रे युनिटच्या अधिकारी आणि कर्मचार्यांचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले.
जागतिक अंमली पदार्थ विरोधी सप्ताहानिमित्ताने मुंबई पोलिसंाकडून वेगवेगळ्या ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अलीकडेच वांद्रे येथील खेरवाडी, पुरुषोत्तम हायस्कूलमध्ये वांद्रे युनिटच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलकडून ड्रग्जविरोधी जनजागृती मोहीम राखविण्यात आलीी होती. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षिस समारंभ शुक्रवारी १० जुलैला पुरुषोत्तम हायस्कूलमध्ये संपन्न झाला. यावेळी शाळेच्या संचालिका प्रेमा कोटीयन, मुख्याधापिका वंदना व्ही कांबळे, सूत्रसंचालक संगीता यादव, वांद्रे युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक् विशाल चंदनशिवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजली वाणी, पोलीस हवालदार अमोल साळुंखे, विक्रम काळे, महिला पोलीस शिपाई अर्चना पोमन आदी उपस्थित होते.
चित्रकला स्पर्धेमध्ये उत्कृष्ठ चित्रकला आणि बोधवाक्य सादर करणार्या विद्यार्थ्यापैकी प्रथम क्रमांक मलिया सिंग, द्वितीय क्रमांक मालविया बाकी, तृतीय क्रमांक आफरीन अजीफल खान तसेच स्पर्धेत सहभागी होणार्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी उत्तेजनार्थ पारितोषिक तहानी शेखआणि आलिया सिंग यांना देण्यात आले होते. त्यांना सन्मानचिन्ह, बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक आणि पालकांची मोठ्या उपस्थिती होती. या कार्यक्रमांसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजली वाणी यांनी विशेष परिश्रम घेतले होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडणार्या वांद्रे युनिटच्या अधिकार्यांचे वरिष्ठांनी कौतुक केले होते. तसेच भविष्यात अशाच प्रकारे ड्रग्जविरोधी जनजागृती मोहीम राबविण्याचा पोलिसांना सल्ला दिला होता.