गरीबीसह बेरोजगारीला कंटाळून आलेल्या ३७ बांगलादेशींना अटक

मुंबई शहरात गुन्हे शाखेच्या तीन युनिटची धडक कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० जुलै २०२६
मुंबई, – बांगलादेशातील गरीबीसह बेरोजगारी कंटाळून कोलकातामार्गे मुंबईसह उपनगरात वास्तव्यास असलेल्या ३७ बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी तीन युनिटच्या अधिकार्‍यांनी अटक केली. मुंबई शहरात एकाच वेळेस ही कारवाई हाती घेण्यात आली होती. त्यात काही महिलांसह मुलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याविरुद्ध विदेशी नागरिक कायदा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन या सर्वांना पुन्हा त्यांच्या मायदेशात पाठविले जाणार आहे.

गेल्या काही वर्षांत मुंबई पोलिसांनी अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. आतापर्यंत अनेक बांगलादेशी नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे, तरीही वेगवेगळ्या परिसरात काही बांगलादेशी राहत असून मिळेल ते काम करत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे अशा बांगलादेशी नागरिकांची माहिती त्यांच्याविरुद्ध कारवाईचे आदेश वरिष्ठांकडून सर्वच गुन्हे शाखेच्या युनिटला देण्यात आले होते.

ही शोधमोहीम सुरु असतानाच गुन्हे शाखेच्या युनिट अकराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप येडे-पाटील, युनिट सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे, नऊचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन पुराणिक यांच्य पथकाने विविध ठिकाणी कारवाई करुन ३७ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. त्यात काही महिलांसह मुलांचा समावेश आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत घोणे व त्यांच्या पथकाने चार पुरुष, तेरा महिला आणि तीन मुले अशा वीसजणांवर कारवाई करण्यात आली होती. यापूवी्र या पथकाने एका पुरुष, तीन महिला आणि दोन मुलांवर कारवाई केली होती.

तपासात त्यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याचे कुठलेही पुरावे सापडले नाही. बांगलादेशातील बेरोजगारी आणि गरीबीला कंटाळून ते सर्वजण बांगलादेशातून कोलकाता आणि नंतर मुंबईत आले होते. मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असताना ते सर्वजण मिळेल ते काम करत होते. बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याविरुद्ध विदेशी नागरिक कायदा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती. या सर्वांना लवकरच बांगलादेशात पाठविण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांत बांगलादेशी नागरिकांविरुद्ध विशेष कारवाई सुरु केल्याने स्थानिक नागरिकांनी आपल्या परिसरात कोणीही बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती असल्यास स्थानिक पोलिसांना ही माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page