फोनसह ईमेल आयडीद्वारे सीएच्या बँक खात्यावर दहा लाखांचा डल्ला

अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ ऑगस्ट २०२६
मुंबई, – फोनसह ईमेल आयडीद्वारे बँकेत संपर्क साधून एका वयोवृद्ध सीएच्या बँक खात्यावर दोन अज्ञात सायबर ठगांनी सुमारे दहा लाखांचा डल्ला मारल्याचा प्रकार विलेपापर्ले परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तक्रारदार सीएच्या तक्रारीवरुन दोन्ही सायबर ठगाविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

६७ वर्षांचे रमेशचंद्र भवरलाल जैन हे विलेपार्ले परिसरात राहत असून सीए म्हणून काम करतात. त्यांची स्वतची आर. बी जैन असोशिएटस नावाची एक कंपनी आहे. त्यांच्यासह त्यांच्या पत्नीचे एका खाजगी बँकेत संयुक्त बँक खाते आहे. या खात्याचा वापर ते दोघेही नेटबँकिंग तसेच डेबीट कार्डवरुन करतात. पत्नीच्या भविष्यासाठी त्यांनी काही रक्कम त्यांच्या खात्यात बचत करुन ठेवली होती. ३१ जुलैला त्यांच्या खात्यात १२ लाख ४३ हजार ६८३ रुपये शिल्लक होती. ३ ऑगस्टला त्यांनी नेटबँकिंगचा वापर करण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्यांना त्यांचे अकाऊंट डिऍक्टीव्ह असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या वैयक्तिक ईमेल आयडीवरुन बॅकेला नवीन पासवर्ड क्रिएट करण्यासाठी विनंती केली होती.

काही वेळानंतर बँकेने त्यांना नवीन पासवर्ड तयार करुन ईमेलवर पाठवून दिला होता. ६ ऑगस्टला त्यांनी बँक खात्यातील शिल्लक रक्कम पाहिली असता त्यांच्या बँक खात्यात २ लाख ४३ हजार ६८३ रुपये शिल्लक असल्याचे दिसून आले. तीन दिवसांत त्यांनी कोणताही ऑनलाईन व्यवहार केला नव्हता. तरीही त्यांच्या बँक खात्यातून दहा लाख रुपये डेबीट झाले होते. त्यामुळे त्यांनी या व्यवहाराची माहिती असता २ ऑगस्टला त्यांच्या बँक खात्यात दोन वेगवेगळ्या बँक खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये ट्रान्स्फर झाल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी त्यांच्या पत्नीकडे विचारणा केली असता तिला या दोन्ही व्यवहाराबाबत काहीच माहिती नसल्याचे समजले.

या घटनेनंतर त्यांनी बँकेला फोनवरुन घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी त्यांना तातडीने सायबर हेल्पलाईन १९३० वर तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांना सायबर हेल्पलाईनसह विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. प्राथमिक तपासात अज्ञात सायबर ठगांनी त्यांच्या वतीने बँकेत फोनसह ईमेल आयडीवरुन संपर्क साधून दोन्ही बँक खात्यात प्रत्येकी पाच लाख रुपये ट्रान्स्फर करण्याची विनंती पाठविली होती. त्यामुळे बँकेने संबंधित दोन्ही बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर केली होती.

फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच दोन्ही सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही बँक खात्याची माहिती काढून त्यांच्यवर लवकरच कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page