मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ ऑगस्ट २०२६
मुंबई, – ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका त्रिकुटाला एमएचबी कॉलनी पोलिसांनी अटक केली. आरिफ अस्तुन अन्सारी, शेख बिलाल मोहम्मद नौशाद आणि मेहबूब नौशाद आलम अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांवर गॅस बिल अपडेटच्या बहाण्याने एका शिक्षिकेची फसवणुक केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यांत त्यांनी मुख्य सायबर ठगांना विविध बँकेत खाती पुरविले होते. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा झाल्याचे तपापसात उघडकीस आले आहे. पोलीस कोठडीनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
सुरेखा जयवंत जाधव ही महिला बोरिवलीतील एक्सर रोड, सीकेपी कॉलनीत राहत असून दादरच्या कमला मेहता स्कूल फॉर द ब्लाईंड शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. ३० जानेवारीला ती तिचा मोबाईल घरी ठेवून कामावर निघून गेली. याच दरम्यान तिच्या मोबाईलवर दया मिश्रा नावाच्या एका व्यक्तीने कॉल केला होता. हा कॉल तिची भाची तृप्ती राजेंद्र जाधवने घेतला होता. त्याने त्यांच्या महानगर गॅस लिमिटेडचे गॅसचे बिल अपडेट नाही. त्यामुळे रात्री नऊ वाजता तयंचा गॅस कनेक्शन बंद होणार आहे. याबाबत त्याने एक मॅसेजही पाठविला होता. ही माहिती तृप्तीकडून मिळताच तिने संबंधित व्यक्तीला कॉल करुन माहिती घेतली होती. यावेळी त्याने तिला गॅस बिल अपडेटसाठी व्हॉटअपवर एक फाईल पाठविली होती. तिने ती फाईल ओपन केली,
यावेळी समोरील व्यक्तीने केलेल्या सूचनेप्रमाणे तिने त्यात माहिती अपलोड केली होीत. मात्र तिने बँकेचे अकाऊंट क्रमांक आणि युजर आयडी माहिती न भरता फोन बंद केला होता. त्यानंतर तिला गॅस बिल अपडेटसाठी सतत कॉल येत होते, मात्र तिने कोणाचेही कॉल घेतले नाही. २ फेब्रुवारी २०२६ तिला गॅसचे १३५० रुपयांचे बिल आले होते, मात्र तिने बिल भरले नाही. त्यामुळे तिला लेट फीसोबत१४५० रुपये भरण्याचा मॅसेज प्राप्त झाला होता. त्यानंतर तिच्या भाचीने महानगर गॅस लिमिटेडच्या रजिस्ट्रर क्रमांकावरुन पेमेंट भरले, त्याची पावतीही तिला मिळाली होती. तरीही तिला वेगवेगळ्या मोबाईलवरुन गॅस बिलसंबंधी कॉल येत होते.
१४ फेब्रुवारीला तिला तिच्या दोन्ही बँकेचे काही मॅसेज आले होते. त्यात तिच्या दोन्ही बँक खात्यातून काही रक्कम डेबीट झाल्याचे नमूद केले होते. तिच्या बँक खात्याची डिटेल्स चोरी करुन तिच्या संमतीशिवाय अज्ञात सायबर ठगांनी ही फसवणुक केली होती. जवळपास अकरा व्यवहारात तिच्या खात्यातून ४ लाख ९९ हजार ४५७ रुपये डेबीट झाले होते. हा प्रकार उघडकीस येताच तिने सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला हेता. त्यांनी तिला स्थानिक पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तिने एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अज्ञात सायबर ठगांचा शोध सुरु केला होता. ज्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढताना आरिफ अन्सारी, शेख बिलाल आणि मेहबूब आलम या तिघांचे नावे समोर आली होती. त्यानतर या तिघांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तपासात ते दोघेही या गुन्ह्यांतील मुख्य सायबर ठगांच्या संपर्कात होते.
त्यांच्या सांगण्यावरुन त्यांनी विविध बँकेत खाते उघडले होते. याच बँकेत फसवणुकीची रक्कम जमा होत होती. सुरेखा जाधव यांच्यासह इतर गुन्ह्यांतील काही रक्कम संबंधित बँक खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. तपासात आलेल्या या माहितीनंतर या तिघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर या तिघांनाही कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.