अनैतिक संबंधातून ३५ वर्षांच्या काकाची अल्पवयीन पुतण्याकडून हत्या

हत्येच्या गुन्ह्यांत पुतण्याची बालसुधारगृहात रवानगी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ ऑगस्ट २०२६
मुंबई, – अनैतिक संबंधातून रविशंकर नंदकिशोर गिरी या ३५ वर्षांच्या बांधकाम मजुराची हत्येचा पर्दाफाश करण्यात खार पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच कुठलाही पुरावा नसताना खार पोलिसांनी विशालकुमार नावाच्या अल्पवयीन आरोपी पुतण्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच ही हत्या केल्याची कबुली दिली. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

खार येथील रोड क्रमांक सात, एसीबीआय बँकेसमोरील एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या बांधकाम साईटच्या एओएस जेनिसिस या ठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेह पडला असून हा मृतदेह बांधकामाच्या साहित्याखाली लपपिण्यात आला होता. ही माहिती प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक् संतोष काते यांच्यासह खार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या व्यक्तीचा मृतदेह पंचनामा ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्यात या व्यक्तीची हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे खार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

प्राथमिक तपासात हा गुन्हा सोमवार १७ ऑगस्टला सकाळी साडेनऊ ते दुपारी दोनच्या सुमारास झाला होता. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले होते. यावेळी त्याचे नाव रविशंकर गिरी असल्याचे उघडकीस आले होते. तो बांधकाम साईटवर मजुरीचे काम करत होता. तपासात रविशंकर हा मूळचा बिहारच्या समस्तीपूर, अमलमपूरचा रहिवाशी होता. या हत्येची घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक् संतोष काते यांना तपासाचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर पोलीस आयुक्त डॉ. मोहितकुमार गर्ग, सहाय्यक पोलीस आयुक्त अधिकराव पोळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काटे, पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, प्रकाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, योगेश जाधव, हणमंत कुंभारे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, शैलेश चौधरी, भाग्यश्री शहाणे, पोलीस अंमलदार राजकुमार कांबळे, कुंदन कदम, अजीत महाडिक, विनोद मदतवाडकर, पोलीस शिपाई महेश लहामगे, नामदेव सावंत, विशाल भामरे, संतोष कांबळे, अभिजीत कदम, सुमीत अहिवळे, सचिन चव्हाण, माणिक ठोंबरे आदी या पोलीस पथकाने तपास सुरु केला होता.

रविशंकरचा पुतण्या विशालकुमार याने पोलिसांना ही माहिती दिली होती. त्यामुळे त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. चौकशीत तो पोलिसांची दिशाभूल करण्याचा तसेच या घटनेबाबत सहानभूती मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्याने दिलेल्या सर्व माहितीची पोलिसांकडून शहानिशा करण्यात येत होती. तपासात तो सांगत असलेली विसंगत होती, त्यामुळे परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि इतर कामगारांची पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. त्यात मिळालेली माहिती वेगळी होती.

या गुन्ह्यांत विशालकुमार याचाच सहभाग असल्याचे काही पुरावे पोलिसांच्या हाती सापडले होते. त्यामुळे त्याला पोलिसांनी चांगलाच पोलिसी इंगा दाखविलाद होता. यावेळी त्यानेच त्याचे काका रविशंकर गिरी यांची हत्या केल्याची कुली दिली. अनैतिक संबंधातून त्याने ही हत्या केली होती. रविशंकरच्या पत्नीचे आरोपीशी प्रेमसंबंध होते, या संबंधाची माहिती रविशंकरला समजली होती. त्यातून त्यांच्यात वाद झाला होता.

या वादातून आरोपीने रविशंकरची हत्या करुन त्याचा मृतदेह बांधकामाच्या साईटच्या साहित्यावर ठेवून पलायन केले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर या अल्पवयीन पुतण्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तो अल्पवयीन असल्याने त्याला नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. कुठलाही पुरावा नसताना केवळ तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करुन आरोपी पुतण्याला ताब्यात घेतले होते. त्यामुळे खार पोलिसांचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page