मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – स्पामध्ये चालणार्या एका सेक्स रॅकेटचा दहिसर पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी स्पाचा कॅशिअर अंकित संजयकुमार चौबे याला दहिसर पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी चार महिलांची सुटका केली असून मेडीकलनंतर या सर्व महिलांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या गुन्ह्यांत तुषार वाडेकर नावाच्या व्यक्तीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
बोरिवलीलतील नॅन्सी कॉलनी, डिजीएस शितल रिगलियामधील पहिल्या मजल्यावर कोर नावाचे एक स्पा आहे. या स्पामध्ये मसाजच्या नावाने सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीची पोलिसांकडून शहानिशा करण्यात आली होती. ही शहानिशा सुरु करताना तिथे सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, सहाय्यक पोलीस आयुक्त जयराज रणवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेरव पाटील, पोलीस निरीक्षक ए. एम देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश साळुंखे, दिपाली खरात, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे, पोलीस हवालदार हेमंत विचारे, महिला पोलीस शिपाई स्नेहा शिंगाडे, पोलीस शिपाई सुनिल राठोड, संतोष भागवत, ऋषिकेश मोरे आदी पथकाने छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी स्पाचा कॅशिअर अंकित चौबे याला अटक केली तर चार महिलांची सुटका केली. या महिलांच्या चौकशीतून तिथे सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले. घटनास्ळाहून पोलिसांनी २१ हजाराची कॅश, एक मोबाईल, एका बँकेचे मशिन, एक कॅटलॉग बुक जप्त केले आहेत. अटकेनंतर अंकितला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. अंकित हा तुषार वाडेकर याच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवत असल्याने त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.
रात्रीच्या वेळेस घरफोडी करणार्या आरोपीस अटक
दुसर्या कारवाईत रात्रीच्या वेळेस घरफोडी करणार्या इरफान रफिक शेख या आरोपीस दहिसर पोलिसांनी अटक केली. त्याच्या अटकेने दहिसरच्या दोन आणि कुरारच्या एक अशा तीन घरफोडीची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. २९ ऑगस्टला दहिसर येथे एका शॉपमध्ये चोरी झाली होती. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, सहाय्यक पोलीस आयुक्त जयराज रणवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक मारुती सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत गिते, पोलीस हवालदार सागर पवार, अमीत पाटील, शहानवाज सय्यद, अमोल जाधव, पोलीस शिपाई सुशांत जाधव, कपिल चौधरी, महेंद्र महाले, ओमकार राणे आदी पथकाने इरफान शेखला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. तो वसई येथील भोईदपाडा परिसरात राहत असून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या अटकेने तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांतील चोरीची रिक्षासह इतर मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.