गोल्ड तस्करी सिंडीकेटच्या मुख्य आरोपीस अटक

सहकार्‍यांच्या अटकेनंतर एक वर्षांपासून फरार होता

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ मे २०२४
मुंबई, – गोल्ड तस्करी सिंडीकेटच्या नरेश देवकर ऊर्फ नवीन या वॉण्टेड मुख्य आरोपीस एक वर्षांनी अटक करण्यात महसूल गुप्तचर संचालनायाच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत यापूर्वी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून या अधिकार्‍यांनी सुमारे सव्वादोन कोटीचे गोल्ड जप्त केले होते. या कारवाईनंतर नरेश हा पळून गेला होता, त्याला एक वर्षांनी या अधिकार्‍यांनी अटक केली.

दुबईहून गोल्ड तस्करी करणार्‍या काही टोळ्या सक्रिय आहे. या टोळ्या विविध मार्गाने दुबईतून गोल्ड आणून त्याची भारतीय बाजारात विक्री करतात. अशा काही टोळ्यांचा आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय तपास यंत्रणेने पर्दाफाश केला होता. गेल्या वर्षी मे महिन्यांत दुबईहून कोट्यवधी रुपयांची गोल्ड तस्करी होणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्‍यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून येणार्‍या प्रत्येक प्रवाशांसह त्यांच्या सामानाची झडती सुरु केली होती. यावेळी दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांना या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्या बॅगेतून सुमारे सव्वादोन कोटीचे पेस्ट स्वरुपात आणलेले गोल्ड या अधिकार्‍यांनी जप्त केले होते. गोल्ड तस्करीप्रकरणी नंतर या दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या त्यांच्या चौकशीत नरेश देवकर याचा सहभाग उघडकीस आला होता. मात्र या दोघांच्या अटकेनंतर तो पळून गेला होता. तोच त्याच्या इतर सहकार्‍यांच्या मदतीने दुबईतून सोन्याची तस्करी करत होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच दोन दिवसांपूर्वी त्याला या अधिकार्‍यांनी अटक केली. नरेश हा सोने तस्करी करणार्‍या टोळीचा सदस्य असून त्याने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या सोन्याची तस्करी केल्याचे बोलले जाते. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page