सोळा वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करुन विनयभंग
विनयभंगासह पोक्सोच्या गुन्ह्यांत आरोपी तरुणाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई – मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून तिच्याशी अश्लील चाळे करुन विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच २१ वर्षांच्या आरोपी तरुणाला एमएआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
४९ वर्षांचे तक्रादार अंधेरीतील एमआयडीसी परिसरात राहतात. त्यांना एक सोळा वर्षांची मुलगी असून ती मानसिकदृष्ट्या विकलांग आहे. आरोपी तरुण याच परिसरात राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. शनिवारी सकाळी सात वाजता त्याने या मुलीला आईस्क्रिम देतो असे सांगून फुस लावून सारीपूत नगर, जेव्हीएलआर रोडवरील स्कॉयवॉकजवळ आणले होते. तिथेच त्याने तिला मारहण करुन तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. त्यानंतर त्याने तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या छातीसह प्रायव्हेट पार्टला अश्लील स्पर्श करुन तिच्याशी लैगिंक चाळे केले. सकाळी अकरा वाजता ही मुलगी घरी आली असता तिच्या वडिलांकडून विचारपूस करण्यात आली होती. त्या वेळेस तिने काहीही सांगितले नाही.
मात्र मंगळवारी हा प्रकार तिच्याकडून त्यांना समजला होता. ही माहिती ऐकून त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी तरुणाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध ७४, ७६ भारतीय न्याय सहिता सहकलम ७, ८, ९ (के), १०, ११ (२), १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर काही वेळात आरोपी तरुणाला अंधेरी परिसरातून अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.