पंधरा लोक आरडीएक्स घेऊन निघाल्याच्या धमकीने तणावाचे वातावरण

अज्ञात व्यक्तीकडून निनावी कॉल-मॅसेजद्वारे धमकीची मालिका सुरुच

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ ऑगस्ट २०२६
मुंबई, – कुरार पोलीस ठाण्यात मुंबईत शहरात आगामी काही दिवसांत मोठ्या प्रमाणात घातपात घडविण्याची धमकीचा कॉल आल्याची घटना ताजी असताना दोन दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांकडून मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला एक मॅसेज प्राप्त झाला आहे. त्यात पंधरा लोक पंजाबहून आरडीएक्स घेऊन निघाले असून दिल्लीसह मुंबई, कानपूर, नोएडा शहरात गेल्याचा सांगण्यात आले. या धमकीनंतर संबंधित सर्व राज्य पोलीस प्रमुखांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. शहरात कुठलीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांत अज्ञात व्यक्तीकडून सतत निनावी कॉल-मॅसेजद्वारे धमकी देण्याच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली असून प्रत्येक धमकीनंतर पोलिसांकडून त्याची शहानिशा केली जात आहे. मात्र बहुतांश कॉल आणि मॅसेज बोगस असल्याचे उघडकीस आले आहे.

मंगळवारी दुपारी बारा वाजता मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला प्रणावती फाटक नावाच्या एका व्यक्तीने मोबाईलवरुन कॉल केला होता. त्याने धीरज ऊर्फ वनराज नावाचा एक व्यक्ती कुरार पोलीस ठाणे उडवून देण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तमुंबई पोलिसांनी ट्विटर हॅण्डलवर पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीने ९ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात घातपात होणार आहे. पाकिस्तानी अतिरेक्यांकडून हा हल्ला होणार असून मुंबई पोलिसांनी सावधगिरी बाळगावी असे नमूद केले होते. हा मॅसेज नंतर मुंबई वेब डेव्हल्पमेंट सेंटरच्या अधिकार्‍यांना वरिष्ठांच्या ग्रुपवर पाठविला होता. या धमकीनंतर मुंबई शहरातील सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना सतर्क राहून जास्तीत जास्त नाकाबंदी आणि कोम्बिंब ऑपरेशनवर भर देण्याचे आदेश दिले होते.

या धमकीनंतर गुरुवारी रात्री पावणेनऊ वाजता दिल्ली कंट्रोल रुमला अजय सिंग नावाच्या एका व्यक्तीने कॉल केला होता. त्याने कॉलर बोल रहा १५ आदमी इन्होने पंजाब के रास्ते आरडीएक्स लाकर दिल्ली, नोएडा, मुंबई, कानूपर बनता गया है असे सांगितले. त्यानंतर त्याने कॉल बंद केला होता. अजय सिंग हा उत्तरप्रदेशच्य नोएडा, गौतम बुद्ध नगर, सेक्टर ९३, शर्मिक कुंजचा रहिवाशी आहे. ही माहिती नंतर दिल्ली कंट्रोल रुमचे एच. सी गुरुचरण यांनी मुंबई कंट्रोल रुमला दिली होती. कंट्रोल रुममधून ही माहिती मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आली.

आगामी काळात स्वातंत्र्य दिनासह श्रावण महिन्यांत महत्त्वाचे सण विशेषता गणेशोत्सव येत असल्याने या धम्कीची मुंबई पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. दिल्ली आपल्या देशाची तर मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने या दोन्ही शहरात घातपात घडविल्यास त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले जाते, त्यामुळे या दोन्ही शहरातील पोलीस प्रमुखांना अधिक सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या काळात शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती दक्षता घेण्याचे तसेच शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची विशेष काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. बंदोबस्तात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा पोलिसांना देण्यात आला आहे. दुसरीकडे गुन्हे शाखेसह एटीएसला सतर्क राहण्याचे आदेश देताना गुप्तचर विभागाकडून येणार्‍या प्रत्येक माहितीची योग्य ती शहानिशा करण्याचे आदेश वरिष्ठांकडून दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page