चारकोप येथे मानसिक नैराश्यातून ४० वर्षांच्या व्यक्तीची आत्महत्या
राहत्या घरातील पोटमाळ्यावर गळफास घेऊन जीवन संपविले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ सप्टेंबर २०२६
मुंबई, – कांदिवलीतील चारकोप परिसरात एका ४० वर्षांच्या व्यक्तीने मानसिक नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजू सरवया असे या व्यक्तीचे नाव असून त्याने शनिवारी दुपारी त्याच्या राहत्या घरातील पोटमाळ्याावर गळफास घेऊन जीवन संपविले. त्याच्याकडे पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही, त्यामुळे या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.
राजू हा त्याच्या कुटुंबियांसोबत कांदिवलीतील चारकोप, सेक्टर तीनच्या एका निवासी सोसायटीमध्ये राहत होता. शनिवारी सकाळी नऊ वाजता त्याने नास्ता केला. त्यानंतर तो पोटमाळ्यावरील रुममध्ये गेले. आतून कडी लावून त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दुपारी राजू हा जेवणासाठी खाली आला नाही. त्यामुळे दुपारी दोन वाजता त्याची आई त्याला जेवणासाठी बोलविण्यास गेली होती, मात्र बराच वेळ होऊन त्याने दरवाजा उघडला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने स्थानिक रहिवाशांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. यावेळी तिला राजूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.
या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. यावेळी स्थानिक रहिवाशांनी त्याला खाली उतरवून तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती नंतर हॉस्पिटलमधून चारकोप पोलिसांनाप देण्यात आली होती. ही माहिती प्राप्त होताच चारकोप पोलिसांचे एक पथक शताब्दी हॉस्पिटलमध्ये गेले होते. याप्रकरणी त्याच्या आईची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती, मात्र तिला या आत्महत्येबाबत काहीच माहिती नव्हती.
घटनास्थळी पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे राजूने आत्महत्या का केली याचा खुलासा होऊ शकला नाही. त्याच्या आत्महत्येप्रकरणी कोणीही संशय व्यक्त केला नाही किंेवा तक्रार केली नाही. त्यामुळे चारकोप पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. प्राथमिक तपासात राजू हा काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने गळफास घेऊन स्वतचे जीवन संपविल्याचे बोलले जाते.