कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाची मित्राकडून ४० लाखांची फसवणुक

जिओ गॅलरीच्या बांधकामासह नूतनीकरणाच्या नावाने घातला गंडा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० मार्च २०२४
मुंबई, – गुजरात येथे जिओ गॅलरीच्या बांधकामासह नूतनीकरणाचे कंत्राटाच्या कामात गुंतवणुकीवर पन्नास टक्के परतावा देण्याची ऑफर देत एका कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाला त्याच्याच बालपणीच्या मित्राने सुमारे ४० लाखांना गंडा घातल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिव्येश जयवंतलाल सोलंकी या मित्राविरुद्ध पंतनगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. दिव्येशने अशाच प्रकारे इतर काही फसवणुकीचे गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

भाविक बिपीनचंद शाह हे बोरिवली येथे राहत असून त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. दिव्येश हा त्याचा बालपणीचा मित्र असून त्याच्या व्यवसायासाठी त्यांनी त्याला १८ लाख रुपये दिले होते. ही रक्कम त्याने काही महिन्यांत परत करुन त्यांचा विश्‍वास संपादन केला होता. काही महिन्यांपूर्वी त्याने त्यांना गुजरात येथे जिओ गॅलरीचे बांधकामासह नूतनीकरणाचे एक मोठे कंत्राट मिळाले होते. त्यासाठी आर्थिक मदतीची गरज असून त्याच्या व्यवसायात त्याने गुंतवणुक करावी. या गुंतवणुकीवर त्याने त्यांना ५० टक्के पार्टनरशीप ऑफर केली होती. ही ऑफर चांगली होती, त्यातच दिव्येश हा त्याचा बालपणीचा मित्र होता, त्याच्या व्यवसायासाठी दिलेले अठरा लाख रुपये त्याने दिलेल्या मुदतीत परत केले होते. त्यामुळे त्याने त्याच्या व्यवसायात गुंतवणुकीचा निर्णय घेत त्याला ४० लाख ५० हजार रुपये दिले होते. काम पूर्ण झाल्यानंतर पेमेंट मिळाल्यानंतर त्याला ५० टक्के प्रॉफिटची रक्कम मिळेल असे त्याने सांगितले होते.

मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना परतावा दिला नाही. पैशांची मागणी केल्यानंतर तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्याने त्यांना पैशांच्या मोबदल्यात घाटकोपर येथे फ्लॅट देतो असे सांगितले. मात्र फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्याने दिलेले धनादेशही बँकेत न वटता परत आले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पंतनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर दिव्येश सोलंकीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page