मुंबई पोलिसांच्या कामगिरीचा आलेख उंचावणारा 

पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पत्रकारांशी साधला संवाद

0
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ सप्टेंबर २०२६
मुंबई, – शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यापासून क्लिष्ट गुन्ह्याची उकल करण्यात पटाईत असणाऱ्या मुंबई पोलिसांच्या यंदाच्या वर्षातील गेल्या आठ महिन्यातील कारवाईचा आलेख उंचावणारा आहे. गंभीर गुन्ह्यापासून ते फरार आरोपीना अटक करणे, सायबर गुन्ह्यात तात्काळ कारवाई करून पैसे फ्रीझ करण्याचे काम पोलिसांनी केले आहे. 
मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलँड पोलिसांशी केली जाते. सण, उत्सवात चोख बंदोबस्त ठेवणे, व्हीपीआयपी अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या संरक्षण पुरवण्यापासून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम मुंबई पोलीस करत आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. आयुक्त देवेन भारती याना मुंबईतील कामाचा असलेला अनुभव कामी येत आहेत. प्रत्येक महिन्याला होणाऱ्या क्राईम मिटिंगमध्ये अधिकाऱ्याशी चर्चा करून गुन्हे प्रकटीकरण याबाबत मार्गदर्शन केले जाते.
आज आयुक्त देवेन भारती यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीशी विविध विषयावर चर्चा केली. १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२६ या काळात पोलिसांनी महत्वाची कामगिरी पार पडली. गेल्या सहा वर्षाच्या विचार केला असता गुन्हे प्रकटीकरण ८५ टक्के इतके झाले आहे. गंभीर गुन्ह्याचा विचार केला असता हत्येच्या गुन्ह्यात ९९ टक्के प्रकटीकरण, हत्येच्या प्रत्यनाच्या गुन्ह्यात १०० टक्के, चोरी, जबरी चोरी मध्ये देखील १०० टक्के आणि ९९ टक्के उकल करण्यात  पोलिसांना यश आले आहे.
विशेष महत्वाचे म्हणजे सायबर गुन्ह्यामध्ये २७ . ६३ टक्के फसवणुकीची रक्कम परत मिळवून ती नागरिकांना परत केली आहे. पोलिसांनी या आठ महिन्यात सुमारे १८३. ३६ कोटी रुपयाची रक्कम फ्रीज करून ती पीडितांना दिल्याची नोंद आहे. त्याच प्रमाणे अमली पदार्थ तस्करांच्या नांग्या ठेवण्याचे काम पोलिसांनी केले आहे. पोलिसांनी २०२४ ते २०२६ या काळात १ हजार ६०६ कोटी रुपयाचा अमली पदार्थ जप्त केला. तसेच पोलिसांनी ३ हजार ५२ केसेस करत ११ ड्रगच्या फॅक्टरी उध्वस्त केल्या आहेत. महत्वाचे म्हणजे प्रवासात नागरिकाचे फोन चोरी, गहाळ होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. चोरीचे मोबाईल सीइआयआर च्या माध्यमातून ट्रेस करून नागरिकांना ते फोन परत करण्याचे प्रमाण ५१ टक्के आहेत.
शहरात गुन्ह्यासोबत महिला सुरक्षेला देखील पोलिसांनी प्राधान्य दिले आहेत. महिलाबाबतचे गुन्हे ४ टक्क्याने कमी झाले आहे. तसेच फरार आणि पाहिजे असलेल्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. फरार असलेल्या ५५९ आणि तर गेल्या २० वर्षांपासून फरार असलेल्या २० हुन अधिक आरोपीना अटक करून त्याना न्यायालयात हजर केले होते. तसेच बांगलादेशीवर देखील पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी गेल्या आठ महिन्यात शहरात मोहीम राबवून १०६६ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. २०२५ मध्ये १०६१ आणि २०२४ मध्ये १६४ बांगलादेशीवर कारवाई केली होती.
शहरात पोलिसांनी पिट एन डी पी एस अंर्तगत १६ सराईत पेडलर वर कारवाई केली आहे. त्याच प्रमाणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत ११ केसेस केल्यात. त्यात एक गुन्हा हा ड्रग शी निगडित होता. पोलिसांनी मोक्का नुसार ६१ जणांना अटक केल्याची नोंद आहे. तरुण पिडीला अमली पदार्थाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी शाळा महाविद्यालयात जनजागृती पर कार्यक्रम आयोजित केले. पोलिसांनी तबबल ११ हजार २९२ शाळा आणि कॉलेजमध्ये कार्यक्रम करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याची नोंद आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page