सोशल मिडीयाच्या माध्यमातून खंडणी वसुलीचा प्रकार उघडकीस
खंडणीची रक्कम घेण्यासाठी आलेल्या रिलस्टार आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ जून २०२६
मुंबई, – सोशल मिडीयाच्या माध्यमातून खंडणी वसुलीचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी उघडकीस आणला आहे. शासकीय अधिकारी असल्याची बतावणी करुन मुलुंडच्या एका व्यापार्याला खंडणीसाठी धमकावून, त्याच्याकडून ऑनलाईन खंडणीची रक्कम वसुल केल्याप्रकरणी रणदीप हरबिंदरसिंग गुजराल नावाच्या एका रिलस्टार आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याच्या कुटुंबियांतील इतर दोघांचा सहभाग उघडकीस आला असून तिसरा आरोपी एका खाजगी वेबपोर्टलचा कर्मचारी आहे. अटर्केीनंतर त्याला रणदीप गुजरालला किल्ला कोर्टाने गुरुवार १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
३५ वर्षांचे तक्रारदार व्यावसायिक असून ते गोवंडीतील देवनार परिसरात राहतात. त्यांच्या मालकीचे मुलुंड येथील वीनानगर सहकारी सोसायटीमध्ये पंजाबी पनीर नावाचे एक शॉप आहे. हरबिंदरसिंग गुजराल, त्यांचा रिलस्टार मुलगा रणदीप, सून अरविंदर कौर यांनी आफ्टरनूर टाईम्सचे कर्मचारी अजीश पण्णीकर यांच्यासोबत खंडणी वसुलीची योजना बनविली होती. त्याचाच एक भाग म्हणून या आरोपींनी तक्रारदाराच्या शॉपमध्ये येऊन त्यांना शासकीय अधिकारी असल्याची बतावणी केली होती. त्यांच्या दुकानातील दुग्धजन्य पदार्थ खरब आहे असून त्याची ते विक्री करुन सर्वसमान्यांची फसवणुक करतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगून त्याचा एक बोगस व्हिडीओ बनविला होता. तो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन त्यांच्यासह त्यांच्या शॉपची बदनामी केली होती. तसेच त्यांचा व्यवसायसह शॉप बंद पाडण्याची धमकी दिली होती.
ही कारवाई करु नये म्हणून त्यांनी त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. त्यांच्याकडून ऑनलाईन ५६ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर उर्वरित खंडणीच्या रक्कमेसाठी ते सर्वजण त्यांना धमकी देत होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी घडलेला प्रकार मुलुंड पोलिसांना सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या आरोपीविरुद्ध शासकीय अधिकारी असल्याची बतावणी करुन खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा मुलुंड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते. हा तपास सुरु असताना रणदीपने तक्रारदारांना खंडणीची उर्वरित रक्कम घेऊन मुलुंड येथील सोनापूर सिग्नजवळ बोलाविले होते. या घटनेनंतर त्यांन मुलुंड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागासह युनिट पाचच्या अधिकार्यांनी सोनापूर सिग्नलजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे खंडणीची रक्कम घेण्यासाठी आलेल्या रणदिपला पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्याने घडलेल्या प्रकाराची कबुली देताना तक्रारदारांना शासकीय अधिकारी असल्याची बतावणी करुन खंडणीसाठी धमकी दिल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. चौकशीत या गुन्ह्यांत हरबिंदरसिंग गुजराल आणि अरविंदर कौर गुजराल यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यांना समन्स देऊन सोडून देण्यात आले आहे.
रणदीपकडून पोलिसांनी खंडणीची स्वरुपात घेतलेली २ लाख ८५ हजाराची कॅश हस्तगत केली आहे. प्राथमिक तपासात ही टोळी सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यावसायिकासह व्यापार्यांना ब्लॅकमेल करुन, शासकीय अधिकारी असल्याची बतावणी करुन खंडणी वसुली करत असल्याचे उघडकीस आले. या टोळीने तक्रारदारासह इतर काही व्यापारी, व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकी दिली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. रणदिप हा रिलस्टार असून त्याने सोशल मिडीयावर एक अकाऊंट उघडले होते.
या अकाऊंटवरुन त्याने बोगस व्हिडीओ व्हायरल करुन तक्रारदार व्यापार्याला खंडणीसाठी धमकी दिली होती. दरम्यान अटकेनंतर रणदिपला सोमवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.