अपहरण केलेल्या मुलाला तृतीयपंथी बनवून भिकेसह पुरुष ग्राहकांसोबत पाठविले
कटातील मुख्य बांगलादेशी किन्नर आरोपीस वाशी येथून अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 एप्रिल 2026
मुंबई, – गोवंडीतील शिवाजीनगर परिसरातून एका सतरा वर्षांचे अपहरण करुन त्याला तृतीयपंथी बनवून लोकल ट्रेनमध्ये भीक मागण्यास तसेच पुरुष ग्राहकांसोबत तरुणीचे कपडे घालून शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कटातील एका मुख्य बांगलादेशी किन्नर आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी वाशी येथून अटक केली. बाबू आयनल खान ऊर्फ बाबू गुरु ऊर्फ बाबू हिजडा असे या 30 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. बाबू खानला सहा महिन्यांपूर्वी मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. यावेळी त्याने मुंबई शहरात लाखो रुपयांची प्रॉपटी घेतल्याचे तपासात उघडकीस आले होते.
यातील तक्रारदार गोवंडी परिसरात राहत असून त्यांना सतरा वर्षांचा एक मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी हा मुलगा अचानक बेपत्ता झाला होता. त्याचा सर्वत्र शोध घेऊन तो सापडला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याची मिसिंग तक्रार केली होती. बळीत मुलगा अल्पवयीन असल्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला होता. त्याचा शोध सुरु असताना या मुलाचे बाबू खान आणि त्याचा सहकारी साफडे ऊर्फ जारा यानेच अपहरण केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या आरोपींच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना बाबू खान हा नवी मुंबईतील कोपरी गाव, वाशी परिसरात लपला असल्याची माहिती युनिट सहाच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक रहाणे, बेळणेकर, नार्वेकर, देसाई, पोलीस हवालदार शिंदे, गायकवाड, तुपे, पोलीस शिपाई बोढारे, महिला पोलीस शिपाई सुतार, बागल यांनी वाशी परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून बाबू खानला ताब्यात घेतले होते. तपासात त्याने तक्रारदाराच्या मुलाचे अपहरण केले होते. त्याला जबदस्तीने तृतीयपंथी बनविले. लोकल ट्रेनमध्ये स्वतच्या फायद्यासाठी त्याला भीक मागण्यास प्रवृत्त केले. त्याला मुलीचे कपडे घालून पुरुष ग्राहकांसोबत अनैसगिक लैगिंकासाठी प्रवृत्त केले होते.
तपासात आलेल्या या माहितीनंतर बाबू खानसह इतर आरोपीविरुद्ध अपहरणासह पिटा, पोक्सो तसेच तृतीयपंथी व्यक्ती अधिनियमच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी शिवाजीनगर पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.
बाबू हा गोवंडीतील शिवाजीनगर, रफिकनगर पार्ट क्रमांक ोन, बावे रेहमत मशिदीजवळील गल्ली क्रमांक नऊमध्ये राहतो. परिसरात ती ज्योती मॉ म्हणून परिचित असून स्वतला किन्नर गुरु म्हणते. ती मूळची बांगलादेशी नागरिक असून त्याला सहा महिन्यांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. तपासात बाबूने मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात प्रॉपटी खरेदी केल्याचे उघडकीस आले होते. त्याच्या अटकेनंतर इतर काही बांगलादेशी किन्नर आणि घुसखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. बाबूने अशाच प्रकारे इतर काही मुलांना तृतीयपंथी बनून त्यांना भीक मागण्यास तसेच इतर गैरकृत्य करण्यास प्रवृत्त केले आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.