कपड्यासह इतर साहित्य वापरतो म्हणून २६ वर्षांच्या तरुणाची हत्या

हत्येचा गुन्हा दाखल होण्यापूर्वी आरोपीचे घटनास्थळावरुन पलायन

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० सप्टेंबर २०२६
मुंबई, – कपडे व इतर साहित्य वापरतो यावरुन झालेल्या वादातून सुरज शंकर डोळे या २६ वर्षांच्या तरुणाची त्याच्याच मित्राने बेदम मारहाणीसह फरशीने हल्ला करुन हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी मित्र बाबासाहेब ऊर्फ सुबोध भिमराव वाघमारे याच्याविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्याानंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

ही घटना मंगळवारी ८ सप्टेंबरला रात्री साडेअकरा वाजता गोरेगाव येथील एस. व्ही रोड, उत्कर्ष स्मॉल फायनान्ससमोरील किंग्ज स्टुडिओजवळ घडली. शंकर राघोजी डोळे हे त्यांची पत्नी महादेवी हिच्यासोबत मिरारोड येथे राहतात. सुरज हा त्यांचा मुलगा असून तो गोरेगाव येथै पाळीव प्राण्यांचे देखभालीचे काम करतो दिवसा काम करुन तो रात्री हनुमान मंदिराजवळ राहत होता. बाबासाहेब त्याचा मित्र असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहे. तोदेखील गोरेगाव येथे राहत असून प्राण्याचे देखभालीचे काम करतो. गेल्या काही दिवसांपासून सुरज हा बाबासाहेब याचे कपडे आणि इतर साहित्य त्याला न विचारता वापरत होता. मंगळवारी तो त्याचे कपड्याची बॅग घेऊन गेला होता. त्याचा बाबासाहेबला प्रचंड राग आला होता.

याच कारणावरुन मंगळवारी ८ सप्टेंबरला रात्री साडेअकरा वाजता गोरेगाव येथील एस. व्ही रोड, किंग्ज स्टुडिओजवळ सुरज व बाबासाहेब यांच्यात वाद झाला होता. या वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन बाबासाहेब याने त्याला बेदम मारहाण केली. तिथे असलेया फरशीने त्याच्या चेहर्‍यावर हल्ला केला होता. या मारहाणीत तो गंभीररीत्या जखमी झाला होता. या हल्ल्यानंतर बाबासाहेब तेथून पळून गेला होता. वेळीच औषधोपचार न मिळाल्याने सुरजचा दुसर्‍या दिवशी मृत्यू झाला होता. ही माहिती नंतर सुरजचा मित्र सुनिल अंबिकाप्रसाद पाडे याने गोरेगाव पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

सुरजचा मृतदेह नंतर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला होता. घडलेला प्रकार नंतर सुनिल पांडे यांच्याकडून शंकर डोळे यांना समजला होता. या घटनेचा तो प्रत्यक्ष साक्षीदार होता. मारहाणीनंतर बाबासाहेब पळून गेल्याने तोदेखील पळून गेला होता. दुसर्‍या दिवशी तो घटनास्थळी आला होता, यावेळी त्याला सुरजची काहीच हालचाल दिसून आली नाही. त्यामुळे त्याने ही माहिती शंकर डोळे यांच्यासह गोरेगाव पोलिसांना दिली होती.

या माहितीनंतर शंकर डोळे यांच्या तक्रारीवरुन गोरेगाव पोलिसांनी बाबासाहेब वाघमारे याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. हल्ल्यानंतर बाबासाहेब हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आरोपी मित्राचे कपडे व इतर साहित्य वापरणे सुरजच्या जिवावर बेतले आहे. एकतुलत्या एका मुलाच्या हत्येनंतर त्याच्या पालकांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page