महिला मदतनीसच्या नावाने अपंग महिलेची सव्वादहा लाखांची फसवणुक

फ्लर्टिफाय क्लबच्या तोतया सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ सप्टेंबर २०२६
मुंबई, – अपंग महिलेला मदतीसाठी मदतनीसच्या कामासाठी महिलेसाठी अर्ज करताना अज्ञात सायबर ठगाने महिलेची सुमारे सव्वादहा लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार दादरच्या नायगाव पोलीस मुख्यालय, परेड ग्राऊंडमध्ये घडली. याप्रकरणी अनिरुद्ध सिंग आणि ललित नाव सांगणार्‍या दोन सायबर ठगाविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी ते फ्लर्टिफाय क्लबचे पदाधिकारी असल्याची बतावणी करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपींच्या अटकेसाठी भोईवाडा पोलिसांच्या सायबर सेलने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

५५ वर्षांची तक्रादार महिला ही गेल्या एक महिन्यांपासून दादरच्या नायगाव, नवीन पोलीस वसाहतीच्या अधिकारी निवास इमारतीमध्ये तिच्या भाऊ आणि वहिनीसोबत राहते. त्यांचे वडिलोपोर्जित नेरळ येथै एक घर असून तिथेच ती एकटी राहत होती. ती अपंग असल्याने तिला मदतीसाठी मदतनीसची गरज होती. त्यामुळे तिच्या भावासह वहिनीने सोशल मिडीयावर महिला मदतनीसचा शोध सुरु केला होता. २ सप्टेंबरला सर्च करताना तिला टेलिग्रामवर एका फ्लर्टिफास क्लबची माहिती दिसली होती. तिथे क्लिक केल्यानंतर तिला अनेक महिला मदतनीस म्हणून उपलब्ध असल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने कस्टमर केअरला संपर्क साधला होता. यावेळी समोरील व्यक्तीने आधी क्लबचे सदस्य होण्यास सांगितले.

तिची माहिती तसेच ओळख खरी आहे हे पडताळून पाहण्यासाठी तीनस्तरीय बँक खात्यात व्यवहार करावा लागेल. त्यासाठी तिला १९९९ अणि २३९९ रुपये भरण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. ही रक्कम तिच्या बँक खात्यात रिफंड होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे तिने ती रक्कम संबंधित बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. त्यानंतर त्यांनी तिला महिला मदतनीससाठी तीन वेगवेगळै प्लॅन सांगितले होते. त्यातील पहिला प्लॅन स्वस्त होता. त्यात तिला ९९९९ रुपये भरावे लागणार होते. त्यामुळे तिने क्लबच्या सभासदसाठी त्यांना ९९९९ रुपये पाठविले होते.

दोन फेरी पूर्ण झाल्यानंतर तिला तिसर्‍या फेरीसाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले. त्यासाठी तिला ३४ हजार ५०० रुपये भरावे लागणार होते. ही रक्कम पाठविल्यानंतर तिला आधीचे पैसे रिफंड होणार होते तसेच तिची एक वर्षांची मेंबरशीप कन्फर्म होणार होती. काही वेळानंतर त्यांनी तिला एक अर्ज पाठवून दिला. त्यात तिने तिची वैयक्तिक माहितीसह इतर तपशील देऊन ३४ हजार ५०० रुपये ट्रान्स्फर केले होते. ही माहिती भरल्यानंतर ते तिला प्रत्येक वेळेस काही तरी चुका दाखवत होते. तिच्याकडे पैशांची मागणी करत होते. तिने पैसे भरले नाहीतर तिचे आधीचे पैसे मिळणार नाही असे सांगत होते.

महिला मदतनीससाठी त्यांनी तिच्याकडून २ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत १० हजार २७ हजार १९६ रुपये घेतले होते, मात्र तिला महिला मदतनीस पाठविली नाही तसेच त्यासाठी घेतलेले पैसेही परत केले नव्हती. अनिरुद्ध सिंग आणि ललित नाव सांगणार्‍या संबंधित दोन्ही आरोपींनी बोगस दस्तावेज, इलेक्ट्रॉनिक साधनाच्या मदतीने तिची फसवणुक केली होती.

हा प्रकार उघडकीस येताच तिने भोईवाडा पोलिसांत तक्रार केली या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित दोन्ही सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेलचे अधिकारी आणि कर्मचारी तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page