गोरेगाव नेस्को सेंटर ड्रग्जप्रकरणी सहाजणांच्या कोठडीत वाढ

ड्रग्ज पुरविणार्‍या आरोपीस अटक व पोलीस कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 एप्रिल 2026
मुंबई, – गोरेगाव येथील नेस्को सेंटरमधील ड्रग्जप्रकरणी अटकेत असलेल्या सहा आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना गुरुवारी दुपारी पुन्हा बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी या सहाही आरोपींच्या पोलीस कोठडीत शनिवार 18 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या सहाजणांमध्ये रौनक राहुल खंडेलवाल, आकाश बनमारी सामल, सनी विनोद जैन, बालकृष्णन बलराम कुरुप, प्रतिक बिजेश पांडे आणि आनंद लक्ष्मण पटेल यांचा समावेश आहे. दरम्यान याच गुन्ह्यांत ड्रग्ज पुरविल्याचा आरोप असलेल्या अन्य एका आरोपीला गुरुवारी वनराई पोलिसांनी अटक केली. विनित सुनिल गेरेलानी असे या 22 वर्षीय आरोपीचे नाव असून तो उल्हासनगरचा रहिवाशी आहे. त्याच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या सात झाली आहे.

शनिवारी नेस्को सेंटरमध्ये एका लाईव्ह कन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कॉर्न्स्टमध्ये तीन हजाराहून तरुण-तरुणी सामिल झाले होते. कार्यक्रमांत दोन तरुणीसह एका तरुणाला मद्यासह ड्रग्जचे सेवन केल्याने त्रास होऊ लागले होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने मालाडच्या लाईफलाईन आणि जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचारादरम्यान बिस्मतसिंह अमरजीत सिंह आणि श्रेया राय या दोघांचा मृत्यू झाला होता तर शीतल साळवी हिच्यावर उपचार सुरु आहे. तिची प्रकृती आता स्थिर असून तिची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिच्यासह आतापर्यंत बाराजणांची पोलिसांनी जबानी नोेंदवून घेतली होती. या जबानीतून अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे.

याप्रकरणी वनराई पोलिसांत विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली होती. या सर्वांना बोरिवलीतील लोकल कोर्टात गुरुवार 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने गुरुवारी दुपारी रौनक खंडेलवाल, आकाश सामल, सनी जैन, बालकृष्णन कुरुप, प्रतिक पांडे आणि आनंद पटेल यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी पाच आरोपींना परिक्षेसाठी कोर्टाने विशेष सवलत दिली होती, त्यामुळे त्यांची पोलिसांना चौकशी करता आली नव्हती. त्यामुळे या पाचही आरोपीसह ड्रग्ज पुरविणार्‍या आनंदच्या पोलीस कोठडीत वाढ मिळावी यासाठी पोलिसांनी विनंती केली होती. या विनंतीनंतर या सहाही आरोपींच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान याच गुन्ह्यांत विनित गेरेलानी या तरुणाचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला गुरुवारी पोलिसांनी अटक केली.

विनित हा उल्हासनगर, चौपडा कोर्टजवळील साई उजाला सोसायटीच्या फ्लॅट 405 मध्ये राहतो. अटकेनंतर त्यालाही गुरुवारी बोरिवलीतील कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला शनिवार 18 एप्रिलर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विनितच्या चौकशीत तो अटक आरोपी आणि पाहिजे आरोपीसोबत नेस्को म्युझिक कॉर्न्स्टमध्ये हजर होता. त्याच्या मोबाईलमध्ये त्याने मोठ्या प्रमाणात अनेकांना ड्रग्ज दिल्याचे, त्यांच्याकडून ड्रग्जचे पेमेंट घेतल्याचे चॅटींग सापडले आहे. त्याच्या बँक खात्यात पेमेंट झाले असून ही रक्कम त्याने त्याच्या आनंद पटेल आणि आयुष साहित्य यांना दिले होते. त्यामुळे त्यांची समोरासमोर चौकशी होणार आहे.

विनितने ड्रग्ज सप्लाय केल्याचे काही स्नॅपचॅट पोसिांना साडले आहे. त्याला अनेकांनी ड्रग्जसाठी कॉल केले होते. आयुष आणि शुभ यांच्याविषयी विनीतला माहिती असल्याने त्याच्या अटकेसाठी विनितची जबानी महत्त्वाची ठरणार आहे. गुन्ह्यांच्या दिवशी ते तिघेही गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये आले होते. ड्रग्ज सप्लाय करणारे संबंधित टोळी असून या टोळीत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला आहे. ते ड्रग्ज कोठून आणतात, कोणाला विक्री करतात, ड्रग्ज विक्रीचे पेमेंट कोणाला केले जाते याचा सुरु आहे.

प्रतिक पांडे, श्रेया रायसोबत इतर मित्रांनी यापूर्वीही ड्रग्ज घेतले होते. रौनकसह इतर चार आरोपींनी एक व्हॉटअप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये ड्रग्जसंदर्भात अनेक चॅटसह आर्थिक व्यवहाराबाबत चर्चा झाली होती. नंतर हा ग्रुप डिलीट करण्यात आला होता. या गुन्ह्यांत दोन मुख्य आरोपीसह इतर आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून या दोघांमध्ये आयुष साहित्य आणि शुभ अग्रवाल यांचा समावेश आहे. या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page