लैगिंक अत्याचार करुन अल्पवयीन मैत्रिणीची बदनामी

प्रियकरासह दोघांविरुद्ध पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ जून २०२६
मुंबई, – लैगिंक अत्याचार करुन एकातांत काढलेले खाजगी फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मैत्रिणीची तिच्याच मित्राने बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार गोवंडी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी मित्रासह दोघांविरुद्ध देवनार पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो व आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हर्षल आणि विश्‍वराज अशी या दोघांची नावे असून यातील हर्षल हा पिडीत मुलीचा मित्र आहे. या गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

पिडीत मुलगी गोवंडी परिसरात राहत असून तिथेच हर्षल हादेखील राहतो. या दोघांमध्ये मैत्रीचे संबंध होते. अलीकडेच त्याने तिला प्रपोज केले होते. तिनेही त्यास होकार दिला होता. याच दरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध आले होते. त्याने तिच्यावर त्याच्या घरासह मामाच्या घरी लैगिंक अत्याचार केला होता. याच दरम्यान त्यांनी एकातांत काढलेले फोटो त्याने सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच विश्‍वराजने संबंधित फोटोचे स्क्रिनशॉट काढून ते फोटो पिडीत मुलीच्या गावच्या मुलांच्या व्हॉटअपवर पाठविले होते.

अशा प्रकारे या दोघांनी तिचा विश्‍वासघात करुन एकातांत काढलेले फोटो सोशल मिडीयावर टाकून तिची बदनामी केली होती. हा संपूर्ण प्रकार एप्रिल-मे २०२६ या दोन महिन्यांत झाला होता. हा प्रकार अलीकडेच पिडीत मुलीच्या लक्षात येताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने देवनार पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपींविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर हर्षल आणि विश्‍वराज या दोघांविरुद्ध लैगिंक अत्याचारासह सोशल मिडीयावर खाजगी फोटो व्हायरल करुन पिडीत मुलीची बदनामी करणे तसेच पोक्सो आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page