फसवणुकीप्रकरणी महानगर गॅस कंपनीच्या तोतया कर्मचार्याला अटक
वयोवृद्धांची एमजीएल कर्मचारी असल्याची बतावणी करुन फसवणुक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ सप्टेंबर २०२६
मुंबई, – महानगर गॅस लिमिटेड कंपनीच्या नावाने फसवणुकीचे प्रकार सुरु असताना एका वयोवृद्धाच्या घरी आलेल्या अज्ञात व्यक्तीने महानगर गॅस लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगून फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या महेंद्रसिंग बहादूरसिंग राजपूत नावाचय एका तोतया कर्मचार्याला एमएचबी पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास करत आहे.
७९ वर्षांचे तक्रारदार त्यांच्या पत्नीसोबत दहिसर येथे राहतात. त्यांची पत्नी एका बँकेतून निवृत्त झाली असून तिला मिळणार्या पेंशनवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. ११ जुलैला दोघेही पती-पत्नी घरीच होते. याच दरम्यान तिथे एक तरुण आला. त्याने तो महागनर गॅस कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगून त्यांच्या घरातील गॅसचे मीटर रिडिंग घ्यायचे आहे असे सांगितले. त्याच्या गळ्यात एमजीएल कंपनीचे आयकार्ड होते, त्यामुळे तो महानगर गॅस लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे समजून त्यांनी त्याला घरात घेतले होते. मीटर रिडिंग करताना त्याने गॅस लिक होत असल्याचे सांगून तपासणी सुरु केली होती.
काही वेळानंतर थातूरमातूर काम करुन त्याने गॅस लीक बंद करण्यासाठी मीटरचे वॉल बदली करावे लागेल. त्यांनी त्याला होकार दिल्यानंतर त्याने नवीन वॉल लावून दिला. त्यानंतर त्याने त्यांना १४ हजार ८०० रुपयांचे बिल दिले होते. ही रक्कम जास्त असल्याने त्याने त्यांना आठशे रुपये कमी करुन चौदा हजार रुपये देण्यास सांगितले. त्यांनी त्याला चेक किंवा ऑनलाईनने पेमेंट करतो असे सांगताच त्याने फक्त कॅश घेत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्यांना दोनशे रुपयांच्या साठ नोटा म्हणजे बारा हजार रुपये दिले होते. यावेळी मागणी करुनही त्याने त्यांना जुना वॉल दिला नाही. काही वेळानंतर तो घाईघाईने तेथून निघून गेला.
हा प्रकार संशयास्पद ाटताच त्यांनी महागनर गॅस कंपनीत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर कंपनीने त्यांच्या घरी कोणालाही मीटर रिडिंगसाठी पाठविले नव्हते असे समजले. त्यामुळे ते स्वत कंपनीत गेले होते, त्याने दिलेली पावती दाखविली, यावेळी तिथे असलेल्या कर्मचार्याने ती पावती बोगस असल्याचे सांगितले. महानगर गॅस कंपनीचा कर्मचारी सांगून या व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश करुन थातूरमातूर काम करुन त्यांच्याकडून बारा हजार रुपये घेऊन फसवणुक केली होती.
या प्रकारानंतर त्यांनी एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रज्ञारीनंतर पोलिसांनी बोगस ओळखपत्र दाखवून फसवणुक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी महेंद्रसिंग राजपूत याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.
चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते.