युनियनच्या नावाने टोळी बनवून खंडणी वसुली करणार्‍या टोळीला दणका

सातजणांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई; मुख्य आरोपीचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ सप्टेंबर २०२६
मुंबई, – युनियनच्या नावाने टोळी बनवून खंडणी वसुली करणार्‍या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी दणका देत सातजणांविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली. पूरण अरुण सिंग ऊर्फ चड्डा, रोहित मधुकर साळुंखे, इम्रान बसुद्दीन हवालदार, सुरेश गुलाबचंद गौड ऊर्फ किसन, आकाश मानसिंग सिंग ऊर्फ नेपाळी, राजकुमार सेल्वन मुन्नूस्वामी ऊर्फ लाला आणि अर्जुन मुनियाान मुत्तू ऊर्फ डाकू अशी या सातजणांची नावे आहेत. या टोळीचा म्होरक्या कन्नन चिन्नादुराई वन्नियार ऊर्फ बडा कन्ना असून तो फरार आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

अंधेरी परिसरात माथाडी कामगार युनियनच्या नावाने या आरोपींनी स्वत टोळी बनविली होती. टोळीचे वर्चस्व निर्माण प्रस्थापित करुन दहशत निर्माण करुन खंडणी वसुलीचा धंदा सुरु केला होता. ऑगस्ट महिन्यांत नदीम नसरुद्दीन शेख यांना या टोळीने खंडणीच्या वादातून बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी हत्येसह खंडणी तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून सात आरोपींना अटक केली होती. प्राथमिक तपासात या आरोपींनी माथाडी कामगार टोळीच्या नावाने बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी संघटित टोळी स्थापन केली होती. या टोळीचा मुख्य आरोपी बडा कन्ना होता.

त्याच्याच आदेशावरुन इतर सहकारी खंडणी वसुली करत होते. या आरोपींविरुद्ध यापूर्वी हत्येचा प्रयत्न, खंडणी, गंभीर दुखापत करणे अशा अनेक गुन्हे दाखल आहेत. बडा कन्ना याने त्याच्या सहकार्‍यांच्या मदतीने अनेक व्यावसायिक, व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकी दिली होती. कंपनीची गाडी अडविणे, तलवारीसह चाकूने प्राणघातक हल्ला करुन खंडणी वसुली केली होती. त्यांच्या या कृत्यांमुळे समाजात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत संबंधित आरोपीविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश एमआयडीसी पोलिसांना दिले होते.

या आदेशानंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्क्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनश्याम नायर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोजकुमार माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक राक्षे, पोलीस उपनिरीक्षक हुजरे, नवले, पर्बंत, गोंदुकप्पे यांनी संबंधित सातही आरोपीविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाईला सुरुवात केली होती. वरिष्ठांकडून मंजुरी मिळताच अटकेत असलेल्या सातजणांवर आता मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीने माथाडी कामगाराच्या नावाने टोळी बनवून खंडणी वसुली करणार्‍या आरोपींमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page