तीन वर्षांच्या मुलीवर पित्यासह वयोवृद्ध आजोबाकडून अत्याचार

दोघांविरुद्ध भान्याससह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 एप्रिल 2026
मुंबई, – कोर्टाच्या आदेशानंतर तीन वर्षाच्या मुलीला पित्यासह वयोवृद्ध आजोबांकडे सोपविल्यानंतर या दोघांनी तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना पवई परिसरात उघडकीस आली आहे. अलीकडेच हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन आरोपी पित्यासह वयोवृद्ध आजोबाविरुद्ध पवई पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्यांच्यावर अद्याप अटकेची कारवाई करण्यात आली असून त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रिती हिरे या करत आहेत.

41 वर्षांची तक्रारदार महिला ही कांजूरमार्ग परिसरात राहत असून एक खाजगी कंपनीत कामाला आहे. मूळचा बंगलोरचा रहिवाशी असलेल्या 40 वर्षांच्या आरोपीसोबत तिचा विवाह झाला होता. त्यांना तीन वर्षांची एक मुलगी आहे. मात्र विवाहानंतर त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरु झाल्याने त्यांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला होता. सध्या ती कांजूरमार्ग येथे तिच्या मुलीसोबत तर तिचा पती त्याच्या कुटुंबियांसोबत बंगलोर येथे राहतो. या दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर कोर्टाने मुलीला भेटण्यासाठी आरोपीला परवानगी दिली होती. त्यामुळे कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार ती तिच्या मुलीला घेऊन आरोपीसोबत जात होती.

ही मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना आरोपी पिता तिच्याशी अश्लील चाळे करुन तिच्याशी लैगिंक चाळे करत होता. त्याच्यासह त्याचे वडिल म्हणजे पिडीत मुलीचे 70 वर्षांचे वयोवृद्ध आजोबादेखील तिच्यासोबत अनेकदा लैगिंक अत्याचार करत होते. डिसेंबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत हा प्रकार पवईतील एका निवासी रुममध्ये घडला होता. अलीकडेच हा प्रकार मुलीकडून तिच्या तक्रारदार आईला समजला होता. ही माहिती ऐकून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता.

गेल्या पाच महिन्यांपासून स्वतच्या जन्मदात्या पित्यासह वयोवृद्ध आजोबांकडून पिडीत मुलीवर लैगिंक अत्याचार सुरु केला होता. त्यामुळे तिने घडलेला प्रकार पवई पोलिसांना आरोपी पित्यासह आजोबाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन कारवाईचे आदेश पवई पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर 40 वर्षांच्या आरोपी पिता आणि 70 वर्षांच्या वयोवृद्ध आजोबाविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रिती हिरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यातआले आहे. सध्या ते दोघेही बंगलोर येथे राहत असल्याने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. नात्याला काळीमा फासणारी ही घटना गुरुवारी उघडकीस येताच तक्रारदार महिलेसह तिच्या कुटुंबियांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page