गॅस कनेक्शनच्या नावाने महिला पोलीस अधिकार्याची फसवणुक
अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 मे 2026
मुंबई, – महानगर गॅस कनेक्शनच्या नावाचे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या महिला पोलीस अधिकार्याची अज्ञात सायबर ठगाने ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या महिला अधिकार्याच्या तक्रारीवरुन वांद्रे पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अज्ञात सायबर ठगाचा शोध सुरु केला आहे. गॅस कनेक्शनच्या नावाने पाठविलेली पीडीएफ फाईल ओपन करुन त्यात स्वतसह बँकेची डिटेल्स भरणे या महिला अधिकार्याला चांगलेच महागात पडले आहे.
मारिया सायमन रॉड्रिक्स या वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलसमोरील वांद्रे पोलीस वसाहत राहत असून सध्या गुप्तवार्ता विभागात सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शनिवार 9 मेला त्या त्यांच्या घरी होत्या. यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. त्यांच्या महानगर गॅस पाईप लाईन कनेक्शन मंजूर झाले आहे. तुम्हाला एक आयडी प्राप्त करणसाठी एक पीडीएफ फाईल पाठविली आहे. ती फाईल ओपन करुन त्याीं डिटेल्स भरण्याची विनंती केली होती.
तिने व्हॉटअपची पाहणी केली असता त्यात महानगर गॅस नावाची पीडीएफ फाईल आली होती. त्यात मारिया यांनी तिच्या माहितीसह बँक खात्याची डिटेल्स भरली होती. ही माहिती अपलोड केल्यानंतर तिच्या बँक खात्यातून 20 हजार आणि 25 हजाराचे दोन ऑनलाईन व्यवहार झाले होते. या व्यवहारातून तिच्या बँक खात्यातून 45 हजार रुपये डेबीट झाले होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने तिला प्रतिसाद दिला नाही.
या घटनेनंतर मारिया रॉड्रिक्स यांनी वांद्रे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्यासह खातेदाराची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.