फेसबुक पाहताना अश्लील पेजवर क्लिक करणे महागात पडले
मोबाईल हॅक होऊन अज्ञात व्यक्तीकडून ऑनलाईन फसवणुक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ जून २०२६
मुंबई, – फेसबुक पाहताना अश्लील पेजवर क्लिक करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. फोटो ओपन केल्यानंतर काही वेळात मोबाईल हॅक झाले आणि त्याच्या बँक खात्यातून ऑनलाईन व्यवहार होऊन सत्तर हजार रुपये डैबीट झाले. याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
३२ वर्षांचा तक्रारदार मूळचा उत्तरप्रदेशच्या सिद्धार्थनगर, हलकोलीचा रहिवाशी असून सध्या तो कुर्ला, कमानी परिसरात राहतो. साकिनाका परिसरात असलेल्या एका गारमेंट कारखान्यात कामाला आहे. १८ मेला सायंाकळी तो भारत पोल कंपाऊंडमधील गारमेंट कारखान्यात होता. यावेळी फेसबुक पाहत असताना तयला बीएक्स सेक्स नावाचे एक पेज दिसले. त्यात काही महिलांचे अश्लील फोटो होते. त्यातील एका फोटोवर त्याने क्लिक केले. काही वेळात त्याचा मोबाईल गरम होऊ लागला आणि मोबाईल अचानक हॅक झाला. त्यानंतर
त्याच्या बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार झाले होते. या व्यवहारातून त्याच्या खात्यातून सत्तर हजार रुपये डेबीट झाले होते. मोबाईल पुन्हा सुरु झाल्यानंतर त्याला बँकेचा मॅसेज प्राप्त झाला होता. त्यात त्याच्या खात्यातून सत्तर हजार रुपये डेबीट झाल्याचा मॅसेज होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्याने नॅशनल सायबर पोर्टलवर ऑनलाईन तक्रार केली होती. त्यांनी त्याला स्थानिक पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता.
त्यानंतर त्याने साकिनाका पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांत सायबर सेलचे अधिकारी तपास करत आहेत. मोबाईलवर बीएक्स सेक्स पेजवर अश्लील महिलांचे फोटो ओपन करणे तक्रारदाराला चांगलेच महागात पडले होते.