स्मिता ठाकरे यांच्या मुलाची मुलाची ऑनलाईन फसवणुक

मोबाईलवर आलेली लिंक ओपन करणे महागात पडले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांचे चिरंजीव ऐश्‍वर्य ठाकरे यांची अज्ञात सायबर ठगाने ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. मोबाईलवर आलेल्या मॅसेजवरील लिंक ओपन करणे त्यांना चांगलेच महागात पडले. अज्ञात सायबर ठगाने त्याच्या बँक खात्यातून १९ हजार ६३८ रुपयांवर डल्ला मारल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

ऐंश्‍वर्य ठाकरे हे अंधेरीतील विंडसर ग्रॅड रेसीडन्सी अपार्टमेंटमध्ये राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्यांच्यासोबत त्यांची आई स्मिता ठाकरे आणि आजी कुंदा चित्रे हे राहतात. ३० ऑक्टोंबरला रात्री दिड वाजता ऐश्‍वर्य हे घरी होते. यावेळी त्यांच्या मोबाईलमध्ये एक मॅसेज प्राप्त झाला होता. त्यात त्यांच्या बँक खात्यातून काही रक्कम डेबीट झाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना बँकेतून इतर पाच मॅसेज आले होते. त्यातही त्यांच्या खात्यातून पैसे डेबीट झाल्याचे दिसून आले.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी बँक खात्याचा बॅलेन्स जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना त्यांच्या खात्यात सहा ऑनलाईन व्यवहार झाल्याचे दिसून आले. त्यात अज्ञात सायबर ठगाने १९ लाख ६३८ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी ओशिवरा पोलिसांना ही माहिती सांगितली. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दुजोरा दिला. फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल असून अज्ञात सायबर ठगांचा शोध सुरु असल्याचे सांगितले. मात्र याबाबत अधिक तपशील सांगण्यास नकार दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page