ड्रग्जच्या तीन कारवाईत विदेशी नागरिकासह सहाजणांना अटक
१.३८ कोटीचे कोकेन, एमडी, ड्रग्जमिश्रीत टॅबलेटचा साठा जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ सप्टेंबर २०२६
मुंबई, – गेल्या ४८ तासांत ड्रग्जच्या तीन विविध कारवाईत एका विदेशी नागरिकासह सहाजणांना मुंबई पोलिसांच्या स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. या सहाजणांकडून पोलिसांनी कोकेन, एमडी आणि ड्रग्जमिश्रीत टॅबलेटचा साठा जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर सहाही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पहिल्या कारवाईत सुमारे ६१ लाखांच्या कोकेनसह एका नायजेरीयन नागरिकाला वरळी युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने लोअर परेल परिसरातून अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी १२२ ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे कोकेन जप्त केले आहे. लोअर परेल परिसरात काहीजण ड्रग्जची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती वरळी युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे, एपीआय दिगंबर पाटील, पोलीस उपनिरीक्षक रोहित साळी व अन्य पोलीस पथकाने तिथे साध्य वेशात पाळत ठेवली होती. गुरुवारी रात्री तिथे एक नायजेरीयन नागरिक आला होता,
त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना १२२ ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारात याच कोकेनची किंमत ६१ लाख रुपये आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. तपासात आरोपी नायजेरीयन नागरिकअ असून काही वर्षांपूर्वी भारतात टुरिस्ट व्हिसावर आला होता. तेव्हापासून तो नालासोपारा येथे राहत होता. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने ड्रग्जची विक्री सुरु केली होती. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला शुक्रवारी दुपारी किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
दुसर्या कारवाईत गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी ट्रॉम्बे येथे कारवाई करुन मोहम्मद तौसिफ नसीम खान आणि मोहम्मद साजिद मोहम्मद रफिक खान या दोघांना ६४ लाखांच्या ड्रग्जमिडीत टॅबलेटसह अटक केली. बुधवारी रात्री गुन्हे शाखेचे युनिट सहाचे अधिकारी परिसरात गस्त घालत होते. प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे, पोलीस निरीक्षक सुशांत सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चौधरी, पोलीस उपनिरीक्षक कल्पना माशेरे, सुहास देसाई, पोलीस हवालदार वानखेडे, भालेराव, पोलीस शिपाई समीर शेख, पांचाळ, बोढारे, महिला पोलीस शिपाई खुटवड आदीचे पथक सायन-पनवेल हायवेच्या सायन येथील सर्व्हिस रोड, ट्रॉम्बे वाहतूक पोलीस चैकीजवळील दक्षिण वाहिनीवर गस्त घालत असताना त्यांना दोन तरुण संशयास्पद फिरताना दिसून आले.
या दोघांनाही पोलिसांनी हटकले असता ते दोघेही त्यांच्याकडील बॅग तिथेच टाकून पळू लागले. यावेळी पळून जाणार्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅगेची तपासणी केल्यानंतर पोलिसांना ड्रग्जमिश्रीत टॅबलेटचा साठा जप्त केला. दोन्ही बॅगेतून पोलिसांनी ६४ लाख रुपयांचे १२ किलो ८१० ग्रॅम वजनाचे ड्रग्जमिश्रीत टॅबलेट जप्त केले आहे. चौकशीत त्यांचे नाव मोहम्मद तौसिफ आणि मोहम्मद साजिद असल्याचे उघडकीस आले. यातील मोहम्मद तौसिफ हा गोवंडीतील शिवाजीनगर तर मोहम्मद साहिद हा मुंब्राच्या कौसा परिसरात राहत होता. ते दोघेही ट्रॉम्बे परिसरात टॅबलेटची विक्रीसाठी आले होते. मात्र विक्री करण्यापूर्वीच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदवून नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत आहे.
तिसरी कारवाई पायधुनी पोलिसांनी केली. मशिद बंदर येथील जंजिकर स्ट्रिट, हॉटेल जोडियामध्ये राहणार्या काही आरोपींकडे एमडी ड्रग्ज असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस उपायुक्त रागसुधा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे, पोलीस हवालदार खान, शिंत्रे, शेंडे, घोडे, बाक्से, पोलीस शिपाई तुंडीवाले, जाधव, इतापे, पाटील, सांगळे, लोके आदी पथकाने हॉटेलच्या दुसर्या मजल्यावर छापा टाकून कपिल गुलशन अरोरा आणि मोहम्मद आसिफ इक्बाल शेख या दोघांना अटक केली होती.
त्यांच्या चौकशीत सईद शेख याचे नाव समोर आले. त्यानंतर त्याला पायधुनी येथून पोलिसांनी अटक केली. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी ४३५.१० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले. त्याची किंमत १३ हजार ५ हजार ३०० रुपरये इतकी आहे. तपासात त्यांनी उल्हासनगर येथील घरी एमडी ड्रग्ज बनविले होते. त्यामुळे तिथे कारवाई करुन पोलिसांनी एमडी ड्रग्ज बनविणारे साहित्य जप्त केले आहेत. या तिघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत् गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.