टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी दोन महिलांसह चौघांना अटक

महिलांवर तिन्ही शूटरला गोळीबारासाठी शस्त्रे पुरविल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – सिनेअभिनेता टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी दोन महिलांसह चारजणांच्या एका टोळीला दिल्लीतील विशेष पथकाने अटक केली. कुणाल संजय, सुमीत बिर्जेंद्र, राधा सुनिल आणि बबिता रामजनल अशी या चौघांची नावे आहेत. यातील राधा ही उत्तरप्रदेशच्या आझमगढ, कोठीयार तर इतर तिन्ही आरोपी हरियाणाच्या सोनीपतचे रहिवाशी आहे. या चौघांनाही पुढील कारवाईसाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले आहे. या चौघांचा ताबा घेऊन संबंधित अधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. राधा आणि बबिता यांनी गोळीबारासाठी तिन्ही शूटरला घातक शस्त्रे पुरविल्याचा आरोप आहे. त्यामुळे या दोघीसह इतर चौघांची पोलिसांकडून कसून चौकशी होणार आहे.

दोन दिवसांपूर्वी घरी जात असताना जुहू येथील पुष्पा पार्कजवळ सिनेअभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर बाईकवरुन आलेल्या तीन अज्ञात तरुणांनी अंधाधूंद गोळीबार केला होता. या गोळीबारात टायगर सुखरुप बचावला, मात्र त्याच्या चालकासह दोनजण जखमी झाले होते. या गोळीबारानंतर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच त्याचा पुढील तपास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपविणयत आला होता. गुन्हा दाखल होताच सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांना तिन्ही आरोपींची ओळख पटली होती.

गोळीबारानंतर ते तिघेही मुंबईहून सुरतमार्गे राजस्थानात पळून गेले होते. त्यामुळे राजस्थान पोलिसांच्या मदतीने तिन्ही शूटरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तिघांचा ताबा मंगळवारी गुन्हे शाखेला सोपविण्यात आला आहे. त्यांना रोडमार्गे मुंबईत आणले जात आहे. रात्री उशिरापर्यंत तिन्ही आरोपींना घेऊन गुन्हे शाखेचे पथक मुंबईत येण्याची शक्यता आहे. ही कारवाई ताजी असताना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्लीतून दोन महिलांसह चौघांना ताब्यात घेतले होते. या चौघांच्या चौकशीत त्यांचा टायगर श्रॉफ गोळीबारात सहभाग उघडकीस आला होता.

ही माहिती मुंबई पोलिसांकडून दिल्ली पोलिसांना देण्यात आली होती, त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान या चौघांना अटक केल्याचे समजताच मुंबई पोलिसांचे एक पथक दिल्लीला गेले होते. या चौघांनाही लोकल कोर्टात हजर करुन त्यांची ट्रॉन्झिंट रिमांड घेण्यात आले होते. कोर्टाने तीन दिवसांची रिमांड दिल्यानंतर या चौघांचा ताबा मुंबई पोलिसांनी घेतला होता. आतापर्यंतच्या तपासात कुणाल हा काही दिवसांपूर्वीच कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. तयची ओळख हरसाना गावातील एका मित्राद्वारे अनिल पंडितशी झाली होती. त्याने त्याचा संवाद एका उनक्रिप्टेड ऍपद्वारे करुन दिला होता.

अनिलच्या सांगण्यावरुन कुणालने अमृतदेह एक पिस्तूल आणि वीस जिवंत काडतुसे घेतली होती. यावेळी सुमीत हादेखील त्याच्यासोबत होता. दोन महिन्यांपूर्वी कुणालची राधाशी ओळख झाली होती. त्याने तिला गुन्ह्यांत सामिल करुन घेतले होते. तिच्याशी संबंध प्रस्थापित केले आणि तिला शस्त्रांसह मुंबईत जाण्यास तयार केले होते. १५ ऑक्टोंबरला कुणाल, राधा आणि बबिता असे तिघेही दिल्लीतून मुंबईसाठी निघाले होते. यावेळी राधाच्या बॅगेत पिस्तूल आणि काडतुसे होते. प्रवासादरम्यान कुणाल हा अनिल पंडितच्या संपर्कात होता. संभाषण रेकॉर्ड होऊ नये म्हणून या दोघांमध्ये ऍपद्वारे संभाषण सुरु होते.

१७ ऑक्टोंबरला ते तिघेही दादर रेल्वे स्थानकात उतरले. तेथून ते एका हॉटेलमध्ये गेले. त्याच दिवशी सकाळी अकरा वाजता एक शूटर हॉटेलमध्ये आला होता. यावेळी राधा आणि बबिताने त्याला पिस्तूल आणि जिवंत काडतुसे दिली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे रविवार १८ ऑक्टोंबरला या तिघांनी टायगर श्रॉफवर जुहू येथे गोळीबार केला होता. त्यापूर्वी १८ ऑक्टोंबरलाच राधा आणि बबिता हे दादर-हरिद्वार एक्सप्रेसमधून दिल्लीला जाण्यासाठी निघाले. प्रवासादरम्यान अनिलचा कुणालला कॉल आला आणि त्याने तिन्ही शूटरला पोलिसांनी अटक केली आहे.

त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याची व्यवस्था करण्यास सांगितले होते. त्यानंतर तो सोनीपत येथे पळून गेला होता. दिल्लीला गेलेल्या राधा आणि बबिताला विशेष पथकाने अटक केली तर कुणाल आणि सुमीतला नंतर सोनीपतमध्ये अटक करण्यात आली. मुंबईत पकडलेल्या तिन्ही शूटरकडून या चौघांविषयी माहिती प्राप्त होताच ही माहिती मुंबई पोलिसांनी लागलीच दिल्ली पोलिसांशी शेअर केली आणि काही तासांत या चारही आरोपींना अटक करण्यात दिल्लीच्या विशेष पथकाला यश आले.

बॉलीवूडचा दुसरा अभिनेता होता शूटरच्या टार्गेटवर
जुहू येथील गोळीबारानंतर मुंबईहून सुरतमार्गे राजस्थानला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तीन शूटरला राजस्थान पोलिसांनी अटक केली. मात्र या शूटरच्या चौकशीतून अत्यंत धक्कादायक माहिती बाहेर आली आहे. टायगर श्रॉफ नव्हे तर बॉलीवूडचा दुसराच अभिनेता त्यांच्या टार्गेटवर होता. टायगरला सुरक्षा नव्हती, त्यामुळे बॉलीवूडवर बिष्णोई टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी टायगर श्रॉफच्या कारवर अंधाधुंद गोळीबार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

दरम्यान तिन्ही शूटरचा ताबा घेऊन गुन्हे शाखेचे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे. रात्री उशिरापर्यंत ही टिम मुंबईत येण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यांत कायदेशीर अटक केल्यानंतर बुधवारी तिन्ही आरोपींना किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे. दरम्यान प्राथमिक तपासात या शूटरच्या टार्गेटवर टायगर श्रॉफ नव्हता. त्यांना दुसर्‍याच एका बॉलीवूड अभिनेत्यावर गोळीबार करायचा होता, मात्र त्याच्या सुरक्षेमुळे त्याच्यापर्यंत त्यांना पोहचता आले नाही. त्यामुळे त्यांनी जुहू येथून घरी जाणार्‍या टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केला होता.

टायगरला पोलीस संरक्षण नव्हते, तसेच त्याच्याकडे खाजगी सुरक्षा नाही. त्यामुळे त्याच्यावर गोळबार करुन बिष्णेाई टोळीला बॉलीवूडमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करायचे होते. बिष्णेाई टोळीच्य टार्गेटमध्ये असलेल्या अभिनेत्याचे नाव मात्र समजू शकले नाही. हा अभिनेता पश्‍चिम उपनगरात राहत असल्याचे बोलले जाते. दरम्यान या गोळीबारानंतर बॉलीवूडमधील काही अभिनेता, अभिनेत्री, निर्माता-दिग्दर्शकांनी पोलिसांकडे पोलीस संरक्षणाची मागणी केल्याचे बोलले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page