टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी अनिल पंडीतच्य वहिनीला पोलीस कोठडी

संपूर्ण कटाची माहितीसह आरोपींना आर्थिक मदत केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – सिनेअभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबारप्रकरणी वॉण्टेड मुख्य आरोपी अनिल पंडितची वहिणी सुनैहा पंडित हिच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर तिला मोक्का कोर्टाने १६ नोव्हेंबरपय्रंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांतील आर्थिक मदत केल्याचा तिच्यावर आरोप असून तिला या संपूर्ण कटाची माहिती असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. या गुन्ह्यांत अटक झालेली सुनैहा ही तेरावी आरोपी असून यापूर्वी बारा आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. ते सर्वजण सध्या पोलीस कोठडीत आहे. सुनैहाच्या अटकेने अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

१८ ऑक्टोंबरला जुहू येथे सिनेअभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर बाईकवरुन तीन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर तिन्ही शूटर पळून गेले होते. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच त्याचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला होता. हा तपास हाती घेताना मुंबई पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या मदतीने गोळीबारातील तिन्ही शूटर फुलसिंह नरेशकुमार ऊर्फ फुली, रेहान रहिसुद्दीन अन्सारीर ऊर्फ सुका आणि रितिक राम मेहतो या तिघांना कोटा रेल्वे स्थानकातून अटक केली होती. ते तिघेही मुंबई-पुणे-राजस्थान-दिल्ली मार्गे नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र नेपाळला जाण्यापूर्वीच या तिघांना पोलिसांनी अटक केली.

त्यांच्या चौकशीतून राधा सुनिल वर्मा, , बबीता रामजतन राव, कुणाल संजयकुमार जमिनसिंग आणि सुमीत बिजेंदर सरोलिया यांचे नावे समोर आले होते. त्यानंतर या चौघांनाही दिल्लीसह हरियाणा येथील सोनीपत येथून पोलिसांनी अटक केली होती. या चारही आरोपींना गोळीबाराच्या कटाची संपूर्ण माहिती होती. त्यांनी गोळीबारासाठी शस्त्रे पुरविली होती. सात आरोपींच्या अटकेनंतर याच गुन्ह्यांत अंकित ऊर्फ सरपंच राजेश खटक, समीर हसन खत्री आणि जतीन क्रिशन पांचाळ या तिघांना इंदौर येथून अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर नंतर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती.

याच गुन्ह्यांत अटक करुन त्यांना मोक्का कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीत या संपूर्ण कटात अनिल पंडित याचे नाव समोर आले होते. त्यानेच या कटाची योजना बनविली होती. आर्थिक मदतीसह शूटरला शस्त्रे पुरविली होती. याकामी त्याला त्याची वहिणी सुनैहा पंडितने मदत केली होती. तपासात ही माहिती उघड होताच तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने तिला १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिच्या बँक खात्यातून विदेशातून क्रिप्टो करन्सीद्वारे पैसे ट्रानस्फर झाले होते. तिचे वॉलेट तिचा पती अभिषेक पंडित चालत होता. या वॉलेटमध्ये आलेले पैसे नंतर आरोपींना देण्यात आल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page