मुंबई पोलीस दलातील आठ उपायुक्तांच्या बदल्या

गुन्हे शाखेत नवनाथ ढवळे यांची नियुक्ती

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 मे 2026
मुंबई, – राज्यातील आयपीएस अधिकार्‍यांच्या बढती-बदलीनंतर मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या आठ पोलीस उपायुक्तांच्या मंगळवारी बदल्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यात गुन्हे शाखेत अंमली पदार्थ विरोधी पकिाचे उपायुक्त नवनाथ ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांच्या बदल्या करताना त्यांच्या नवीन नियुक्त केलेल्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश दिले आहे.

रविवारी मुंबई पोलीस दलातील दहा पोलीस उपायुक्तांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यात परिमंडळ अकराचे पोलीस उपायुक्त संदीप जाधव यांची नाशिक शहराच्या गुन्हे अन्वेषण विभाग, परिमंडळ बाराचे महेश चिमटे यांची नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमी, दशहतवाद विरोधी पथकाच्या तांत्रिक शाखेचे पोलीस अधिक्षक जयंत मीना यांची परिमंडळ तीन, नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांची परिमंडळ चार, राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस उपायुक्त संदीप घुगे यांची परिमंडळ अकरा, फोर्स वनचे पोलीस अधिक्षक गजानन राजमाने यांची परिमंडळ बारा, परिमंडळ आठचे पोलीस उपायुक्त मनिष मलवानिया यांची परिमंडळ एक, परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांची परिमंडळ दोन, विशेष कृती दलाचे पोलीस उपायुक्त निमित गोयल यांची परिमंडळ आठ, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मोहितकुमार गर्ग यांची परिमंडळ नऊमध्ये बदली दाखविण्यात आली होती.

मंगळवारी आणखीन आठ पोलीस उपायुक्तांच्या बदल्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी काढले आहे. या पाच अधिकार्‍यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांची गुन्हे शाखा, सायबर सेलचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांची नवीन परिमंडळ एक, नवी मुंबईचे परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांची विशेष कृती दल, अमरावती शहराचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांची नवीन परिमंडळ दोन, राज्यपालांचे परिसहायक अभयसिंग देशमुख यांची परिमंडळ तीन, परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांची दक्षिण वाहतूक विभाग, दक्षिण वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त प्रशांत परदेशी यांची वरळी सशस्त्र पोलीस विभाग, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांची नवी मुंबईच्या पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page