पंधरा वर्षांच्या मावस बहिणीवर लैगिंक अत्याचार

आरोपी भावाची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 जून 2025
मुंबई, – भांडी देण्यासाठी गेलेल्या पंधरा वर्षांच्या मावस बहिणीवर तिच्याच अल्पवयीन भावाने लैगिंक अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना चेंबूर परिसरात उघडकीस आली आहे. लैगिंक अत्याचारानंतर आरोपीने चाकूचा धाक दाखवून हा प्रकार कोणाला सांगितला तर जिवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच सतरा वर्षांच्या आरोपी भावाला आरसीएफ पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्याला पुढील कारवाईसाठी डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

तक्रारदार महिला ही चेंबूर परिसरात राहत असून पंधरा वर्षांची पिडीत तिची मुलगी आहे. आरोपी हा तिच्या बहिणीचा सतरा वर्षांचा मुलगा आहे. 1 मार्चला ती तिच्या मावशीकडे भांडी देण्यासाठी गेली होती. यावेळी घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन तिच्या मावस भावानेच तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. घरातील भाजी कापण्याचा चाकूने घेऊन त्याने तिला हा प्रकार कोणालाही सांगू नकोस, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. बदनामीसह जिवाच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र नंतर तिने तिच्या आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिने आरोपी अल्पवयीन भाच्याविरुद्ध आरसीएफ पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तो अल्पवयीन असल्याने त्याला नंतर बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते.

भांडुप येथे अल्पवयीन बहिणीवर भावाकडून अत्याचार
अन्य एका घटनेत भांडुप येथे बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच सख्ख्या भावाने लैगिंक अत्याचार केला. याप्रकरणी सोळा वर्षांच्या आरोपी भावाला भांडुप पोलिसांनी ताब्यात घेऊन डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविले आहे. पिडीत आणि आरोपी सख्खे बहिण-भाऊ असून ते भांडुप परिसरात राहतात. 1 जून 2024 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत आरोपीने त्याच्याच बारा वर्षांच्या बहिणीवर अनेकदा जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. हा प्रकार तिच्या तिच्या आईच्या लक्षात येताच तिने तिची चौकशी केली होती. यावेळी घडलेला प्रकार उघडकीस आला होत. तिच्याकडून ही माहिती ऐकल्यांनतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने तिच्याच मुलाविरुद्ध भांडुप पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी भावाविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी बालसुधारगृहात पाठविले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page