मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 जून 2025
मुंबई, – राज्य पोलीस दलातील अकरा सहाय्यक पोलीस आयुक्ताच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यात दहा अधिकार्यांची मुंबईत तर एका अधिकार्याची बदली दाखविण्यात आली आहे.
शुक्रवारी सायंकाळी गृहविभागाचे अवर सचिव संदीप गोरखनाथ ढाकणे यांनी या अकरा पोलीस अधिकार्याच्या आदेश दिले होते. त्यात खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे पोलीस उपअधिक्षक संजय दामोदर डहाके, नाशिक गुन्हे शाखेच्या प्रशिक्षण केंद्राचे महेश नारायण मुगुटराव, पुण्याच्या महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपअधिक्षक अविनाश प्रल्हाद पालवे, रायगडच्या महामार्ग पथकाच्या पोलीस उपअधिक्षक ज्योत्सना विलास रासम, ठाण्याच्या महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधिक्षक कल्पना यशवंत गाडेकर, छत्रपती संभाजीनगर, मनमाड लोहमार्ग उपविभागाचे सूर्यकांत गणपत बांगर, कोल्हापूर मुख्यालयाचे पोलीस उपअधिक्षक मृत्यूजय धानय्या हिरेमठ, नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षकाचे वाचक रेणुका शंभुराज बुवा (होनप), नवी मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभाग, कोकन भवनचे अप्पर पोलीस अधिक्षक शशिकांत शंकर माने, नाशिक महाराष्ट्र पोलीस अकादमीचे सुहास पांडुरंग कांबळे यांची मुंबईत बदली दाखविण्यात आली आहे तर मुंबईचे एकमेव सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज बाबूराव खंडाळे यांची नाशिकच्या गुन्हे प्रकटीकरण प्रशिक्षण केंद्राच्या पोलीस उपअधिक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.