बँकाँकहून आणलेल्या कोकेनसह दोन महिलांना अटक

79 कोटीचे 7.95 किलो कोकेनचा साठा हस्तगत

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – बँकाँकहून आणलेल्या कोकेनसह दोन महिलांना सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. या दोन्ही महिलांकडून या अधिकार्‍यांनी 7 किलो 950 ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 79 कोटी रुपये इतकी आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कोकेन जप्तीची मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ही चालू वर्षांची पहिलीच कारवाई आहे. या दोन्ही महिलांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांना त्यांना किल्ला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बँकाँकहून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांत अनेक प्रवाशांना हायड्रोपोनिक गांजासह इतर ड्रग्जच्या साठ्यासह अटक झाली आहे. त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त केला होता. तरीही बँकाँकहून ड्रग्ज तस्करीचे प्रकार सुरुच होते. अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध सीमा शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. विशेषता बँकाँकहून येणार्‍या प्रत्येक संशयित प्रवाशासह त्यांच्या सामानाची तपासणी केली जात होती. ही कारवाई सुरु असताना बँकाँकहून काही प्रवाशी कोट्यवधी रुपयांचे कोकेनची तस्करी करणार असल्याची माहिती या अधिकार्‍यांना मिळाली होती.

या माहितीनंतर या अधिकार्‍यांनी शुक्रवारी बँकाँकहून आलेल्या दोन संशयित महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या सामानाची झडती घेतली असता खेळण्याच्या पाकिटात 22 विटांच्या आकाराचे पांढर्‍या रंगाचे पाडवर सापडले होते. एचडीपीएस फिलड किटसह या पावडरची चाचणी घेण्यात आली होती. त्यात ती पावडर कोकेन असल्याचे उघडकीस आले. या कारवाईत या अधिकार्‍यांनी दोन्ही महिलांकडून 7 किलो 950 ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले आहे. त्याची किंमत 79 कोटी रुपये इतकी आहे.

तपासात त्यांना ते कोकेन बँकाँक येथे एका व्यक्तीने दिले होते. ते पार्सल त्यांना मुंबई विमानतळाबाहेर एका व्यक्तीला द्यायचे होते, मात्र त्यापूर्वीच या दोन्ही महिलांना या अधिकार्‍यांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करणयात ाअला आहे. अटकेनंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने दोघींनाही चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page