पोलीस पथकाशी हुज्जत घालून शिवीगाळ करुन मारहाण

पाचही आरोपी तरुणांना अटक व नोटीस देऊन सुटका

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 मार्च 2026
मुंबई, – विरुद्ध दिशेने विनाहेल्मेट बाईक चालविल्याप्रकरणी कारवाई करताना एका बाईकस्वारासह त्याच्या चार सहकार्‍यांनी पोलीस पथकाशी हुज्जत घालून, शिवीगाळ करुन मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार जे. जे ब्रिजवर घडली. याप्रकरणी मुख्य आरोपीसह पाचजणांविरुद्ध जे. जे मार्ग पोलिसांनी भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन पाचही आरोपींना अटक केली. आफ्ताब अक्रम खान, शोएब हसरुद्दीन कुरेशी, नुरहबीब आलम शेख, साई प्रसाद बोडोपेली आणि सैफ शकील अहमद मणियार अशी या पाचजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. रविवारी घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ही घटना रविवारी रात्री दिड वाजता जे. जे ब्रिज, डिम टिमकर रोड, सर जे जे मार्ग पोलीस ठाण्यासमोरच घडली. गणेश शिवाजी बनकर हे कल्याण येथील आडवली, मंगेश पार्क अपार्टमेंटमध्ये राहतात. सध्या ते जे. जे मार्ग पोलीस ठण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. रविवारी रात्री ते पोलीस ठाण्यासमोरच कर्तव्य बजावत होते. यावेळी त्यांना एक बाईकस्वार डिमटिमकर रोडकडून विरुद्ध दिशेने विना हेल्मेट घालून बाईक चालवत असल्याचे दिसून आला. त्यामुळे त्यांनी बाईकस्वाराला थांबवून त्याच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. त्याचा राग आल्याने त्याने त्यांच्यासह इतर पोलिसांशी विनाकारण हुज्जत घालण्यास सुरुवात केली होती. त्याने त्यांच्या अंगावर बाईक घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी त्याच्या बाईकची चावी काढली होती.

तरीही तो पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी पोलीस हवालदार वाघ यांनी त्याला शांत राहण्यास सांगितले. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ सुरु केली होती. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या इतर चार तरुणांनीही पोलिसांशी मोठ्या आवाजात वाद घालून त्यांची हिम्मत कशी झाली, आता तुम्हाला बघतोच अशी धमकी देत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर त्यांनी त्यांच्या मोबाईलवरुन व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न कलेा.

यावेळी तिथे आलेल्या पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे यांनी त्यांना शांत राहून काय झाले याबाबत विचारणा केली. त्यांनी त्यांनाही धमकावून त्यांच्या मनगटावर चावीने मारहाण करुन दुखापत झाली होती. या घटनेने तेथील वातावरण तंग झाले, त्यामुळे तिथे अतिरिक्त पोलीस पथकाला पाठविण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करुन पाचही तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते. तिथे आणल्यानंतर त्यांची नावे आफ्ताब खान, शोएब कुरेशी, नूरहबीब शेख, साई बोडोपेली आणि सैफ मणियार असल्याचे उघडकीस आले.

याप्रकरणी गणेश बनकर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पाचही आरोपीविरुद्ध कर्तव्य बजाविणार्‍या पोलिसांशी हुज्जत घालणे, शिवीगाळ करुन मारहाण, सरकारी कामात अडथळा आणणे तसेच अन्य भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या पाचजणांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page