स्वतच्या घरी चोरी करणार्‍या दिराच्या पत्नीला अटक

दोन वर्षांत टप्याटप्याने दागिने-कॅश चोरी केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ जुलै २०२६
मुंबई, – स्वतच्या घरी चोरी केल्याप्रकरणी दिराच्या पत्नीला दिडोंशी पोलिसांनी अटक केली. जुई असे या महिलेचे नाव असून अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांत जुईने शिक्षिका असलेल्या तक्रारदार महिलेसह तिच्या पतीने विविध सोन्याचे दागिने आणि अडीच लाखांची कॅश असा सुमारे साडेपाच लाखांचा मुद्देमाल चोरी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मे महिन्यांत गुन्हा दाखल होताच एक महिन्यानंतर तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

३४ वर्षांची तक्रारार महिला तिच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरारत राहते. ती शिक्षिका असून तिचे पती शेअरमार्केटमध्ये काम करतात. २०१२ साली तिचे लग्न झाले होते, लग्नानंतर ती तिच्या सासू-सासरे आणि दिरासोबत राहत होती. २०२३ साली तिच्या सासर्‍याचे निधन झाले होते. त्यानंतर जानेवारी २०२४ रोजी त्यांनी तिच्या दिराचे जुई गोविंद पासवानशी लग्न लावून दिले होते. लग्नानंतर जुई त्यांच्यासोबत राहत होती. घरातील सर्व मंडळी त्यांचे दागिने बेडरुमच्या वॉर्डरोबच्या लॉकरमध्ये ठेवत होते. ११ जुलैला तिला एका लग्न कार्यक्रमासाठी जायचे होते, त्यामुळे तिने तिच्या पतीला वॉर्डरोबमधून काही दागिने काढण्यास सांगितले, यावेळी तिच्या पतीला तिथे दागिने सापडले नाही. दागिने घरातच कुठेतरी असतील म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.

ऑक्टोंबर २०२४ रोजी तिच्या दिराचे जुईसोबत कौटुंबिक वाद झाला होता. त्यानंतर ती रागाच्या भरात घरातून निघून गेली होती. काही दिवस आईकडे राहिल्यानंतर ती तिच्या पुण्यातील मैत्रिणीकडे राहण्यासासठी गेली होती. काही दिवसांनी तिच्या घरच्या लोकांनी तिची समजूत काढून तिला पुन्हा घरी आणले होते. याच दरम्यान तिच्या पतीने त्याची अंगठी मागितली, त्यामुळे तिने वॉर्डरोबमधून अंगठी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला अंगठीसह इतर दागिने आणि अडीच लाखांची कॅश मिसिंग असल्याचे दिसून आले. यावेळी तिची जाऊ जुईचे सर्व दागिने तिथे होते, मात्र तक्रारदार महिलेसह तिच्या पतीचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले.

ही चोरी जुईनेच केल्याचा तिला संशय होता. मात्र घरात वाद नको म्हणून तिने हा प्रकार कोणाला सांगितला नाही किंवा तिची पोलिसांत तक्रार केली नाही. त्यानंतर तिने अनेकदा दागिन्यांचा शोध घेतला, मात्र तिला कुठेच दागिने सापडले नाही. मार्च महिन्यांत तिने हा प्रकार जुईच्या मालाड येथील मालवणी, आक्सा बिच, धारवली येथे राहणार्‍या एका मैत्रिणीला सांगितली होती. यावेळी तिने या चोरीमागे जुईचा हात असल्याचे सांगून तिला काही दागिन्यांचे फोटो व्हॉटअप पाठविले होते. ते फोटो पाहिल्यानंतर तिने तिला तिचे कर्णफुले आणि अंगठी तिने जुईकडे पाहिल्याचे सांगितले.

ही माहिती समजताच तिला जुईनेच घरातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची खात्री पटली होती. त्यानंतर तिने जुईविरुद्ध ८२ ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने आणि अडीच लाखांची कॅश असा सुमारे साडेपाच लाखांचा मुद्देमाल चोरीची दिडोंशी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांची तिची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीनंतर तिला शुक्रवारी ३ जुलैला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page