जस्ट डायलमधून डॉक्टरची अपॉईटमेंट घेणे चांगले महागात पडले

सायबर ठगाकडून बँक खात्यावर सहा लाखांचा डल्ला

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ जुलै २०२६
मुंबई, – स्वतसह सूनेच्या त्वेचा ऍलर्जीवर त्वचारोगतंत्र डॉक्टरचा जस्ट डायलमधून मोबाईल प्राप्त करुन अपॉईटमेंट घेण्याचा प्रयत्न एका महिलेला चांगलाच महागात पडला आहे. स्वतची माहिती सबमिट करण्यासाठी पाठविलेल्या एपीके लिंक ओपन केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाने महिलेच्या बँक खात्यावर डल्ला मारला. या ठगाने तिच्या बँक खात्यातून वेगवगळे व्यवहार करुन सुमारे सहा लाखांची ऑनलाईन फसवणुक केली. मुलाने आईच्या मोबाईलची पाहणी केल्यानंतर बारा दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

५९ वर्षांची तक्रारदार महिला ही बोरिवली परिसरात राहते. त्यांचा सन इंटरप्रायजेस नावाचे लेडीज पर्स विक्रीचा नागपाडा येथील मदनपुरा परिसरात एक शॉप आहे. २ जुलैला तिच्या मुलाने तिच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे सहा लाख रुपयांची कॅश ट्रान्स्फर केली होती. ही कॅश काही वेळानंतर तिच्या बँक खात्यात जमा झाली होती. जून महिन्यांत तिच्या सूनेला त्वचेची ऍलर्जी झाली होती. त्यामुळे तिने तिच्या मोबाईलवरुन तिच्या ऍलर्जीवर उपचार करणार्‍या डॉक्टरची माहिती काढण्यासाठी जस्ट डायलवर मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिला एक मोबाईल क्रमांक मिळाला होता.

या मोबाईलवर संपर्क साधून तिने त्वचारोगतंत्र डॉक्टरची ऑनलाईन अपॉईटमेंट घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी समोरील व्यक्तीने तिच्या व्हॉटअपवर एक एपीके फाईल पाठविली होती. ही फाईल ओपन करुन तिला तिची माहिती अपलोड करुन अपॉईटमेंट घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे तिने ती लिंक ओपन करुन त्यात तिच्या सूनेच्या ऍलजीविषयी माहिती सबमिट केली होती. ही माहिती सबमिट केल्यानंतर तिच्या बँक खात्यातून १९ जून ते १ जुलै २०२६ या कालावधीत काही ऑनलाईन व्यवहार झाले होते. या सर्व व्यवहारातून तिच्या बँक खात्यातून सुमारे सात लाख रुपये डेबीट झाले होते.

हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने तिच्या मुलाला ऑनलाईन व्यवहाराची माहिती दिली होती. त्याने तिच्या मोबाईलची तपासणी केल्यानंतर तिने जस्ट डायल क्रमांकावर मिळालेल्या मोबाईल क्रमांकावर तिला एक एपीके फाईल पाठविण्यात आली होती, ती लिंक ओपन करुन तिने तिची माहिती सबमिट केल्यानंतर हा संपूर्ण ऑनलाईन व्यवहार झाल्याचे दिसून आले.

फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने बोरिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नांदवून तपास सुरु केला आहे. जस्ट डायलमधून त्वचारोग तंज्ञ डॉक्टरचा मोबाईल शोधून काढणे या महिलेला चांगलेच महागात पडले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page