पालघर येथून सात भिक्षेकरी तृतीयपंथी बांगलादेशी नागरिकांना अटक
उपासमारीसह बेरोजगारीला कंटाळून बांगलादेशातून पळून आले होते
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ जुलै २०२६
मुंबई, – पालघर येथून सात भिक्षेकरी बांगलादेशी नागरिकांना एमआयडीसी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. मोहम्मद जिहाद मोहम्मद मोहम्मिल अली, मोहम्मद हमीदूर मोहम्मद रेहमान, मोहम्मद जोदुल हक मोहम्मद शुकूरअली, मोहम्मद जॉनी बाबू मोहम्मद शाहिदूल इस्लाम, आकी मोहम्मद नागरअली मोनी, मोहम्मद मुशरफ फैदुश खान आणि पिहू इस्लाम अशीरउद्दीन अशी या सात बांगलादेशी तृतीयपंथींची नावे आहेत. ते सर्वजण सध्या पालघरच्या कामणगावात राहत होते. उपासमारीसह बेरोजगारीला कंटाळून ते सर्वजण भिक्षा मागण्यासाठी बांगलादेशातून पालघर परिसरात आले होते. तेथून ते वेगवेगळ्या ठिकाणी भिक्षा मागण्याचे काम करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
गेल्या काही वर्षांत मुंबई पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना काही बांगलादेशी तृतीयपंथी पालघर परिसरात राहत असल्याची एमआयसीडी पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनश्याम नायर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामदास बोराडे, पोलीस हवालदार राजू ईटकर, टायगर मंडले, पोलीस अंमलदार संदेश देसाई, निलेश साळुंखे, पोलीस शिपाई भोसले, महिला पोलीस शिपाई चाळके यांनी नायगावच्या मुंबई-अहमदाबाद हायवे, हॉटेल मॅट्रिक्स परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून सात तृतीयपंथी बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याचे कुठलेही पुरावे सापडले नाही. त्यांनी ते सर्वजण बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. बांगलादेशातील उपासमारीसह बेरोजगारीला कंटाळून ते सर्वजण काही महिन्यांपूर्वी भारतात आले होते. तेव्हापासून ते पालघर परिसरात राहत होते. विविध ठिकाणी ते भिक्षा मागण्याचे काम करत होते. त्याच्याकडून पोलिसांनी सात मोबाईल हस्तगत केले आहेत. त्यात त्यांच्या जन्माचा दाखला तसेच बांगलादेशी नागरिक असल्याचे काही पुरावे सापडले आहे. ते सर्वजण नियमित त्यांच्या कुटुंबियासह नातेवाईक आणि मित्रांच्या संपर्कात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्या अटकेनंतरचा अहवाल विशेष शाखा एककडे सादर करण्यात आला आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन त्यांना त्यांच्या मायदेशात पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.