बोगस इलेक्ट्रीक डिव्हाईस फसवणुकप्रकरणी अधिकार्‍याला अटक

कोचमधून धूरसह आगसदृष्य परिस्थितीत निर्माण होऊन प्रवाशांच्या जिवितास धोका

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ जुलै २०२६
मुंबई, – बोगस आणि खराब एमपीसीबी इलेक्ट्रीक डिव्हाईस पाठवून मध्य रेल्वेची फसवणुक केल्याप्रकरणी कोलकाताच्या एका खाजगी कंपनीशी संबंधित अधिकार्‍याला शाहूनगर पोलिसांनी अटक केली. दिनेश रामआश्रय मिश्रा असे या आरोपी अधिकार्‍याचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीच्या कंपनीने पाठविलेले इलेक्ट्रीक डिव्हाईस फिरोजपूर पंजाब मेलच्या एका कोचमध्ये लावण्यात आले, या कोचमधून धूरसह आगसदृष्य परिस्थिती निर्माण होऊन रेल्वे प्रवाशांच्या जिवीतास धोका निर्माण झाल्याचा आरोप रेल्वेच्या वती तक्रार अर्जात करण्यात आला होता. त्यामुळे या तक्रारीची शाहूनगर पोलिसांनी गंभीर दखल घेत ही कारवाई केली. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

विक्रांत रेवानाथ म्हैसकर हे गोरेगाव येथील न्यू दिडोंशी संकल्पसिद्धी सोसायटीमध्ये राहत असून मध्य रेल्वेमध्ये सिनिअर मटेरियल मॅनेजर म्हणून काम करतात. सध्या त्यांची नेमणूक माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये आहे. त्यांच्यावर रेल्वेसाठी लागणारी साधनसामुग्री खरेदी करुन स्टोअर जमा करणे तसेच गरजेनुसार रेल्वे वर्कशॉप पुरवठा करण्याची जबाबदारी आहे. नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या अधिकृत वेसाईटवर इलेक्ट्रीक डिव्हाईसची एक निवीदा काढण्यात आली होती. त्यासाठी कोलकाताच्या ऍस्पी कार्पोरेशनने अर्ज केला होता. सर्व शहानिशा केल्यानंतर त्यांच्या कंपनीला रेल्वे विभागासाठी लागणारे ३२५ इलेक्ट्रीक डिव्हाईसची ऑर्डर देण्यात आली होती, त्याची किंमत ४ लाख २९ हजार ५२० रुपये इतकी होती.

त्यांनी दिलेल्या ऑर्डरनंतर त्यांच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये कंपनीने ३२५ एमपीसीबी डिव्हाईस कुरिअरने पाठवून दिले होते. यावेळी कंपनीने त्यांना डिव्हाईसची टेस्ट सर्टिफिकेट व्हॉटअपवर पाठवून दिली होती. टेक्निकल निरीक्षक रोहिनी मिंगल यांच्याकडून तपासणी करुन कंपनीला ४ लाख २९ हजार ५२० रुपयांचे पेमेंट करण्यात आले होते. या डिव्हाईसची वर्कशॉपमध्ये तपासणी केल्यानंतर त्यातील काही डिव्हाईस कोच क्रमांक २२२९६१ मध्ये बसविण्यात आले होते. हा कोच नंतर पंजाब मेल १२१३७ या रेल्वेला जोडण्यात आला होता. ही रेल्वे ७ मार्चला मुंबईहून फिरोजपूर येथे जाताना रेल्वेच्या डब्ब्यातून अचानक धूर निघाला होता. त्यामुळे फिरोजपूर पंजाब मेलमधील कर्मचार्‍यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली होती.

या संपूर्ण घटनेची चौकशीसाठी एक कमिटीची नेमणूक करण्यात आली होती. त्यात फिरोजपूर पंजाब मेलमध्ये लावण्यात आलेले इलेक्ट्रीक डिव्हाईस बोगस व खराब असल्याने ते हाय होल्टेज करंट असूनही ट्रिप झाले नव्हते. ऍस्पी सेल्स कार्पोरेशन कंपनी त्यांच्या कंपनीची डिलर नव्हती. कंपनीकडून देण्यात आलेले डिव्हाईस त्यांचा नसून जुना वॉरंटी कालावधी संपलेला होता. तसेच या कंपनीकडून त्यांना कुठलेही टेस्ट सर्टिफिकेट देण्यात आले नसल्याचा अहवाल वरिष्ठांना सादर कण्यात आला होता. बोगस आणि खराब डिव्हाईस पाठवून कोचमध्ये धॅर निघून आगसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कोचमधील प्रवाशांच्या जिवीतास धोका निर्माण झाला होता. त्यामुळे बोगस आणि खराब डिव्हाईस पपाठवून ऍस्पी सेल्स कार्पोरेशन कंपनीने प्रवाशांच्या जिवीतास धोका निर्माण होण्यास असे कृत्य करुन रेल्चेची फसवणुक केली होती.

हा प्रकार उघडकीस येताच मध्य रेल्वेच्या वतीने विक्रांत म्हैसकर यांनी शाहूनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी कोलकात्याच्या ऍस्पी सेल्स कार्पोरेशन कंपनीसह संचालकाविरुद्ध फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत दिनेश मिश्रा याची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणात त्याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. अटकेनंतर दिनेशला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. ं

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page