मनी लॉड्रिगप्रकरणी डिजीटल अरेस्टची भीती दाखवून ऑनलाईन गंडा

सायबर ठगांना मदत करणार्‍या संशयिताला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ ऑगस्ट २०२६
मुंबई, – मनी लॉड्रिुंगच्या गुन्ह्यांत डिजीटल अरेस्टची भीती दाखवून स्टेट बँकेतून निवृत्त झालेल्या एका वयोवृद्ध महिलेची ऑनलाईन फसवणुक केल्याप्रकरणी धिरज केसाराम प्रजापत या संशयिताला दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याावर फसवणुकीसाठी सायबर ठगांना मदत केल्याचा आरोप असून याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. धिरजसह इतर आरोपींनी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचे उघडकीस आल्यानंतर फरार असलेल्या या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

७१ वर्षांची निता सुरेश चौलकर ही वयोवृद्ध महिला दहिसर येथे राहत असून ती स्टेट बँकेतून निवृत्त झाली आहे. २ जुलैला घरी असताना तिला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो स्टेट बँकेतून बोलत आहे. तिचे क्रेडिट कार्डचे बिल पेडिंग असून ते बिल भरण्यास सांगितले. यावेळी तिने तिच्याकडे स्टेट बँकेचा क्रेडिट कार्ड नसून बिल भरण्याचा प्रश्‍नच येत नाही. त्यानंतर त्याने वांद्रे येथील शाखेतून कार्डसाठी अर्ज केला होता. तिच्या आधारकार्डचा कोणीतरी गैरवापर केला आहे. त्यामुळे त्याने तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला देऊन फोन बंद केला. काही वेळानंतर तिला दुसर्‍या क्रमांकावर एका व्यक्तीने व्हिडीओ कॉल करुन तो रवीकुमार असल्याचे सांगितले. त्याने पोलीस युनिफॉर्म परिधान केला होता. त्याने तो पोलीस अधिकारी असून त्यांच्या आधारकार्डवरुन संदीपकुमार नावाच्या एका व्यक्तीने स्टेट बँकेचा क्रेडिट कार्ड प्राप्त केला होता.

या कार्डवरुन दुसर्‍या बँक खात्यात अठरा लाख रुपये ट्रान्स्फर झाले आहेत. हा मनी लॉड्रिुंगचा प्रकार असल्याने तिच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले आहे. त्यामुळे तिची पोलिसांकडून चौकशी आहे, या गुन्ह्यांत तुमचा सहभाग उघडकीस आल्यास तिच्यावर अटकेची कारवाई होईल अशी भीती दाखविली होती. यावेळी तिने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तिने कधीही क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला नाही, तिच्या खात्यात तीन हजार कोटीचा व्यवहार झाला नाही असे सांगून तो तिचे ऐकत नव्हता. तिला डिजीटल अरेस्ट केल्याचे सांगून त्याने घरातील सर्व दारे-खिडकी लावून घ्या. याबाबत कोणाचीही चर्चा करु नका. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांच्या जिवाला धोका आहे असे सांगितले.

काही वेळानंतर तिला राजेश मिश्रा नावाच्या व्यक्तीने कॉल करुन या गुन्ह्यांचा तपास त्याच्याकडे असल्याचे सांगितले. त्याने तिच्या बँक खात्याची माहिती काढून तिला तिचे एफडी तोडून तसेच बँक खात्यातील सर्व रक्कम प्रोसेस म्हणून एका बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा सल्ला दिला. ही चौकशी पूर्ण होऊन तिचा सहभाग उघडकीस न आल्यास तिला तिचे सर्व पैसे परत मिळतील असे सांगितले. त्यामुळे तिने तिची एफडी तोडून तसेच बँक खात्यातील सर्व रक्कम मिळून त्याने दिलेल्या बँक खातयत साडेचार लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. दुसर्‍या दिवशी त्याने तिला म्युच्युअर फंडमधील पैसेही जमा करण्यास सांगितले. त्यामुळे ती तिच्या एजंटकडे म्युच्युअल फंडबाबत चौकशीसाठी गेली होती. त्याच्याशी चर्चा करताना तिने घडलेला प्रकार त्याला सांगितला.त्याने तिला तिची सायबर ठगांकडून फसवणुक होत असल्याचे पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला.

तिने घडलेला प्रकार सायबर हेल्पलाईनसह दहिसर पोलिसांना सांगून संबंधित अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुक, खंडणीसह भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा दहिसर पोलीस ठाण्यातील सायबर सेलचे अधिकारी तपास करत होते. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी धीरज प्रजापत या संशयिताला मंगळवारी ताब्यात घेतले होते.

चौकशीत फसवणुकीची ही रक्कम त्याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे उघडकीस आले. त्यानेच सायबर ठगांना फसवणुकीसाठी स्वतच्या बँक खात्याची डिटेल्स पाठविली होती. त्यानंतर त्याच्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाली होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर धिरज प्रजापतला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page