२६ वर्षांच्या प्रेयसीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी प्रियकराला अटक

मानसिक-शारीरिक शोषण करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ ऑगस्ट २०२६
मुंबई, – दहिसर येथे राहणार्‍या वंदना दत्ताराम पांडे ऊर्फ वंदना पवन कुलाल या २६ वर्षांच्या महिलेच्या आत्महत्येप्रकरणी तिचा प्रियकराला दहिसर पोलिसांनी अटक केली. नितीन दिनकर लाड असे या आरोपी प्रियकराचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले. नितीनवर वंदनाचा मानसिक व शारीरिक शोषण करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. वंदनाच्या भावाने हा आरोप करुन त्याच्याविरुद्ध दहिसर पोलिसांत तक्रार केली होती असे पोलिसांनी सांगितले.

दशरथ दत्ताराम पांडे हा २२ वर्षांचा तरुण होमगार्डसह माहीमच्या के. जे खिलनानी हायस्कूलमध्ये पीटी टिचर म्हणून काम करतो. सध्या तो दहिसर येथील ओवरीपाडा, समर बहादूर र्मार्या चाळीत त्यांच्या आई-वडिल, दोन बहिणीसोबत राहतो. त्याची २६ वर्षांची बहिण वंदना हिचे पवन कुलालसोबत २०१८ साली लग्न झाले होते. लग्नानंतर त्यानंा तमन्ना नावाची एक मुलगी झाली होती. लग्नाच्या काही महिन्यांत ती तिच्या पतीपासून विभक्त झाली होती. तेव्हापासून ती त्यांच्यासोबत राहत होती. गेल्या एक वर्षांपासून ती दहिसर येथील एका हॉस्पिटलमध्ये काम करत होती. मात्र तिने ती नोकरी ऑगस्ट २०२६ रोजी सोडून दिली.

१० ऑगस्टला दशरथ पांडे हा नेहमीप्रमाणे कामावर निघून गेला होता. त्यानंतर त्याचे आई-वडिल आणि दुसरी बहिण संजना हीदेखील कामावर निघून गेले होते. यावेळी वंदना ही तिच्या मुलीसोबत घरी होती. दुपारी एक वाजता दशरथ हा घरी आला. यावेळी त्याला दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आला. त्याने दरवाजा ठोठावला, यावेळी वंदनाने कपडे बदलत असल्याचे सांगून त्याला थांबण्यास सांगितले. यावेळी त्याला आतमध्ये एक व्यक्ती असल्याचे दिसून आले, त्यामुळे त्याने वंदनाला कोण आहे याबाबत विचारणा केली. यावेळी वंदना हिने रडायला सुरुवात करुन घरी कोणालाही काहीही सांगू नकोस अशी विनंती करु लागली. याच दरम्यान तिथे तो व्यक्ती आला आणि त्याने त्याला वंदनासोबत लग्न करण्यास आपण इच्छुक असल्याचे सांगितले. त्याने त्याचे नाव नितीन लाड सांगून तो बोरिवलीतील देवीपाडा, एसआरए इमारतीमध्ये राहत असल्याचे सांगितले. त्याच्याशी चर्चा करुन तो घराबाहेर गेला.

अडीच वाजता दशरथ पांडे हा पुन्हा घरी आला. यावेळी त्याला वंदनाने घराच्या छताच्या लोखंडी अँगलला चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. हा प्रकाराने त्याल प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्याने तिला खाली उतरविले आणि जवळच्या अशोक वन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. चौकशीदरम्यान त्याची बहिण संजनाने सांगितले की, वंदना अणि नितीन यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तो वंदनाला क्षुल्लक कारणावरुन मारहाण करत होता. जुले महिन्यांत त्याने वंदनाला तिच्या हॉस्पिटलमधील कामाच्या ठिकाणी बेदम मारहाण केली होती.

तिला मोबाईलवरुन तो तिला नेहमीच शिवीगाळ करत होता. त्याच्या मानसिक व शारीरिक त्रासाला ती कंटाळून गेली होती. त्यामुळे तिने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. मात्र तो तिच्या कामाच्या ठिकाणी जाऊन तिला त्रास देत होता. त्यामुळेच तिने हॉस्पिटलची नोकरी सोडून दिली होती. दुसरीकडे वंदनाच्या आत्महत्येची माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

याप्रकरणी दशरथ पांडे याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीत त्याने वंदनाच्या आत्महत्येला तिचा प्रियकर नितीन लाड हाच जबाबदार असल्याचा आरोप करुन त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी नितीन लाडविरुद्ध वंदनाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page