रुमच्या व्यवहारात १९ लाखांच्या अपहारप्रकरणी मालकास अटक
सात वर्षांत रुमचा ताबासह पैसे परत न करता फसवणुक केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ ऑगस्ट २०२६
मुंबई, – रुमच्या व्यवहारात एका वयोवृद्ध महिलेची सुमारे १९ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी सुरेंद्र सत्यनारायण यादव या आरोपी रुममालकाला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर गेल्या सात वर्षांत रुमचा ताबा तसेच रुमसाठी घेतलेल्या पैसे परत न करता तक्रारदार महिलेची फसवणुक केल्याचा आरोप आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.
माधवी मंगेश गोरिवली ही ६० वर्षांची वयोवृद्ध महिला अंधेरीतील गुंदवली परिसरात भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहते. पूर्वी तिचे कुटुंबिय बोरिवलीतील देवीपाड्यातील तिच्या पुतण्याच्या घरी राहत होते. तेव्हापासून ती स्वतच्या घरासाठी प्रयत्न करत होती. याच दरम्यान तिचा पुतण्याने तिची ओळख जया शेट्टी आणि रामनाथ प्रजापती या रिअल इस्टेटशी करुन दिली होती. यावेळी रामनाथ प्रजापतीने तिला सुरेंद्र यादव याच्याविषयीला सांगितले होते. सुरेंद्र हा मूळचा उत्तरप्रदेशच्या देवरिया, खांडेसरचा रहिवाशी असून तो सध्या बोरिवलीतील देवीपाडा, शंकर मंदिराजवळील शैलेंद्रसिंग चाळीत राहत असल्याचे सांगितले. त्याला त्याचा भाऊ रामबहल यादव याच्या रुमची विक्री करायची आहे, तो रुम त्यांना स्वस्तात मिळवून देतो असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी रामबहलच्या शैलेंद्रसिंग चाळीतील चौदा क्रमांकाच्या रुमची पाहणी केली होती. ही चाळ एसआरए पुर्नविकासात गेली होती.
२०१४ साली त्याने त्याच्या भावाकडून ती रुम खरेदी केली होती. त्याने त्यांना २४ लाखांना रुम विक्रीची ऑफर दिली होती. त्यापैकी १९ लाख रुपये आधी तर उर्वरित पाच लाख रुपये रुमचा ताबा घेतल्यानंतर देण्याचे सांगितले होते. त्याचा प्रपोजल चांगला होता, त्यामुळे तिने त्याच्यासोबत रुमच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरु केला होता. ठरल्याप्रमाणे माधवी गोरविले हिने त्याला सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१६ या कालापवधीत टप्याटप्याने १९ लाख रुपये दिले होते. या पेमेंटनंतर त्यांच्या रुमबाबत एक करार झाला होता.
रुमच्या कागदपत्रांसह नोटरी करुन दिले होते. रुम तिच्या नावावर दहा वर्षांनी होणार होते. त्यामुळे तिने त्याला रुमचे पॉवर ऑफ ऍटनी करुन देण्यास सांगितले. मात्र त्याने तिला पॉवर ऑफ ऍटनी करुन दिले नाही. दुसरीकडे मार्च २०१९ पर्यंत त्याने रुमचा ताबा दिला नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर तो तिला विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तिने रुमचा व्यवहार रद्द करुन त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने सात वर्ष उलटूनही रुमसाठी घेतलेले १९ लाख रुपये परत केले नाही. त्याच्याकडून
फसवणुक झाल्याचे लक्षात येताच माधवी गोरिवले हिने कस्तुरबा मार्ग पोलिसांत सुरेंद्र यादवविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच तीन दिवसांपूर्वी सुरेंद्र यादवला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. सुरेंद्रने याच रुमचा इतर कोणाशी खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.