मालाड येथील बोगस कॉल सेंटरमध्ये पोलिसांचा छापा

लाईफटाईम फ्रॅन्चायसीच्या नावाने गंडा घातला जात होता

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ सप्टेंबर २०२६
मुंबई, – मालाड परिसरात असलेल्या एम फिन्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या बोगस कॉल सेंटरवर बांगुरनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने कारवाई केली. याप्रकरणी कॉल सेंटरच्या मालकासह एकोणीसजणांविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाईफटाईम फ्रॅन्चायसीच्या नावाने ही टोळी अनेकांना गंडा घातल असल्याचे तपासात उघडकीस आले. या कारवाईत पोलिसांनी संगणक, संगणक, मोबाईलसह इतर मुद्देमाल असा सुमारे पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गेल्या आठवड्यात मालाड परिसरातील एका बोगस कॉल सेंटरमध्ये गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी कारवाई केली होती. या कॉल सेंटरमध्ये लाईफटाईम फ्रॅन्चायसीच्या नावाने अनेकांना गंडा घातला जात होता. अशाच प्रकारे मालाड येथील अन्य एका कॉल सेंटरमध्ये अशाच प्रकारे काही लोकांची फसवणुक होत असल्याची माहिती बांगुरनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज दळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक् अंकुश राठोड, महेश कौंडुभौरी, पोलीस उपनिरीक्षक किरपेकर, प्रविण पडलवार, श्रीकांत कर्पे, पोलीस हवादार संदीप संकपाळ, दयानंद बुगडे, दिपक पांझरी, अनंत चित्ते, पोलीस शिपाई संजय वाघ, रोहित सरगर, मच्छिंद्र खेडकर, रोहित आवळकर, देवीदास राऊत, मिथुन गावीत, महिला पोलीस हवालदार सुचिता आचार्य, शितल कदम, महिला पोलीस शिपाई योगिता कळंबटे, दिक्षीता झणझणे, किरण नारायणकर आदी पथकाने संबंधित कॉल सेंटरमध्ये कारवाईस सुरुवात केली होती.

बुधवारी या पथकाने मालाड येथील मार्वे रोड, नूतन शळेजवळील सेझ प्लाझा इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर असलेल्या एम फिन्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बोगस कॉल सेंटरमध्ये छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी कॉल सेंटरचा मालक संतोष सोहनलाल गुप्ता याच्यासह इतर अठराजणांना ताब्यात घेतले होते. या कॉल सेंटरमध्ये ई-कुरिअर आणि ई-कॉमर्स कंपन्याकडून ठराविक रक्कम गुंतवणुक घेऊन लाईफटाईम फ्रॅन्चायसी देतो असे सांगून अनेकांना गंडा घातला जात होता. काही नामांकित कंपनीसोबत करार झाल्याचे भासवून गुंतवणुकदारांना लाईफटाईम फ्रॅन्चायसीसाठी गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले जात होते.

त्यांच्याकडून पैसे घेतल्यानंतर त्यांना कुठलीही फ्रॅन्चायसी दिली जात नव्हती. घटनास्थळाहून पोलिसांनी पंधरर लाखांचा मुद्देमालासह एक करारनाम्याची फाईल सापडली आहे. त्यात कॉल सेंटरच्या मालकाने चार कंपनीच्या फ्रॅन्चायसीसाठी पैसे गुंतवले होते, मात्र त्यांना ठरल्यानुसार व्यवसाय दिला नाही. त्यांची अनामत रक्कम परत केली नव्हती. गुन्ह्यांसाठी टिम लीडर, मॅनेजर आणि कर्मचार्‍यांना एका खाजगी कंपनीचे सिमकार्ड पुरविण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच या सर्वांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page