सात कोटीच्या कोकेनसह विदेशी नागरिकासह दोघांना अटक

आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयची कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 एप्रिल 2026
मुंबई, – सुमारे सात कोटीच्या कोकेनसह एका विदेशी नागरिकासह दोघांना शनिवाारी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. जेझ्रिल लुवाडो कॅस्टेलानो आणि आरिफ दाऊद पटेल अशी या दोघांची नावे असून यातील जेझ्रिल हा दक्षिण आफ्रिका तर आरिफ हा नळबाजारचा रहिवाशी आहे. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्यांना किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

विदेशात होणार्‍या ड्रग्ज तस्करीच्या विरोधात कस्टम अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना जेझ्रिल हा शनिवारी रात्री नैरोबी येथून आला होता. विमानतळाबाहेर जाण्यापूर्वीच त्याला संशयावरुन डीआरआयच्या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्यासह त्याच्या बॅगेची तपासणीदरम्यान या अधिकार्‍यांना 1426 ग्रॅम वजनाचे कोकेनसह इतर ड्रग्जचा साठा जप्त केला. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे सात कोटी रुपये आहे.

तपासात जेझ्रिल हा दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्बर्गचा रहिवाशी आहे. त्याला ते ड्रग्ज नैरोबी विमानतळावर एका व्यक्तीने दिले होते. ते ड्रग्ज त्याला नळबाजार येथे राहणार्‍या आरिफ पटेल याला देण्यास सांगण्यात आले होते. त्याच्या चौकशीतून आलेल्या माहितीनंतर या पथकाने आरिफ पटेलला ताब्यात घेतले होते. गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच जुझ्रिलसह त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page