मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ जुलै २०२६
मुंबई, – दादर येथील नायगाव परिसरातील प्रसिद्ध व्याघ्रेश्वर मंदिरात झालेल्या चोरीचा पर्दाफाश करण्यात भोईवाडा पोलिसांना यश आले आहे. गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. रोहित मल्लेश खंडागळे, आदित्य रमेश प्रसाद आणि साहिल शेख ऊर्फ मांडवा अशी या तिघांची नावे असून ते सर्वजण शिवडी आणि ऍण्टॉप हिल येथील रहिवाशी आहे. त्यांच्याकडून दानपेटीसह चोरीची सर्व कॅश हस्तगत करण्यात आली आहे. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
प्रताप प्रभाकर सूर्यवंशी हे शिवडी येथे राहतात. दादरच्या नायगाव, व्याघ्रेश्वर मंदिरात पुजारी म्हणून काम करतात. त्यासाठी त्यांना मंदिराच्या ट्रस्टीकडून मानधन दिले जाते. तिथे स्वामी समर्थ आणि महादेवाच्या दोन मुख्य मंदिर आहेत. सकाळी सहा वाजता मंदिर उघडून ते साफसफाई करुन पूजा करतात. पूजेनंतर ते साडेसात वाजता निघून जातात. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता ते पुन्हा मंदिरात आल्यानंतर पूजा आणि आरती करुन मंदिर बंद करुन घरी निघून जातात. हा त्यांचा नित्याचा दिनक्रम होता. २९ जूनला ते सकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे मंदिरात आले होते. यावेळी त्यांना स्वामी समर्थ आणि महादेवाच्या मुख्य मंदिरातील तीन दानपेटीतील प्रत्येकी तीन हजाराची कॅश असे नऊ हजाराची कॅश चोरीस गेल्याचे दिसून आले.
अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करुन तिन्ही दानपेटीतील कुलूप तोडून आत कॅश चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार नंतर त्यांनी मंदिरातील ट्रस्टींना दिली होती. मंदिरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर रात्री सव्वादोन ते तीनच्या दरम्यान तीन अज्ञात व्यक्तींनी मंदिरात प्रवेश करुन चोरी केल्याचे दिसून आले. ही माहिती नंतर भोईवाडा पोलिसांना देण्यात आली होती. याप्रकरणी प्रताप सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सोमवारी उघडकीस आलेल्या या चोरीच्या घटनेने स्थानिक भाविकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
या घटनेची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनेाजकुमार शर्मा, अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त अनुराग जैन यांनी गंभीर दखल घेत भोईवाडा पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त माधुरी पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास आव्हाड, पोलीस निरीक्षक नितीन महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली निमसे, पोलीस हवालदार चव्हाण, खेडेकर, राठोड, पोलीस शिपाई सुतार, जोशी यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या पथकाने वेगवेगळ्या परिसरातून रोहित, आदित्य आणि साहिल या तिघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यांनीच मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीच्या दोन दानपेट्या आणि नऊ हजाराची कॅश हस्तगत केली आहे. यातील रोहित शिवडी परिसरात राहत असून गाडी धुण्याचे काम करतो. आदित्य आणि साहिल हे दोघेही ऍण्टॉप हिल येथील रहिवाशी असून आदित्य हा कॅटरिंगचे काम करतो. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांनी अशाच प्रकारे इतर काही मंदिरात चोरी केली आहे का, त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभॅमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
सोनसाखळी चोरीचया गुन्ह्यांतील आरोपींना अटक
अन्य एका कारवाईत सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींना काळाचौकी पोलिसांनी अटक केली. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून दुसर्या आरोपीचे नाव मानव सुनिल धोटे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील बाईकसह एक लाखांची चोरीची सोनसाखळी हस्तगत केली आहे. अनामिका रवी अंगारी ही तरुणी करीरोड येथे राहते. २२ जूनला सकाळी पावणेसहा वाजता ती करीरोड रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होती. यावेळी बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी तिच्या गळ्यातील एक लाखांची दहा ग्रॅम वजनाची सोनसाखळी खेचून पलायन केले होते. या घटनेनंतर तिने काळाचौकी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त अनुराग जैन, सहाय्यक पोलीस आयुक्त धनश्याम पंतगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदिनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमीत भोसने, हसन मुलानी, पोलीस उपनिरीक्षक धनंजय व्यवहारे, अविनाश वाघमारे, शितल माने, पोलीस हवालदार चन्ने, गोपाळ चव्हाण, पोलीस शिपाई प्रशांत पवार, नायकवाडी, सोनावणे, खांडेकर, चंद्रकांत कुंभार, कोळेकर, आंग्रे, महिला पोलीस शिपाई तेजस्विनी गवारी आदीच्या चार विशेष पथकाने आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मानव घोटे व एका अल्वयीन मुलाला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यांतील बाईकसह चोरीची सोनसाखळी हस्तगत केली आहे.
